उपसलेला गाळ पावसापूर्वी हलविण्यासाठी यंत्रणा कार्यरत

उपसलेला गाळ पावसापूर्वी हलविण्यासाठी यंत्रणा कार्यरत

ratchl१०१.jpg
०१८६०
चिपळूणः गोवळकोट येथे वाशिष्ठी नदीपात्रातील उपसलेला गाळ डंपरमध्ये भरण्याचे काम सुरू आहे.
-----------
गाळ हलविण्यासाठी युद्धपातळीवर काम
वाशिष्ठीत उपसा; ४ पोकलेन, १५ डंपरच्या मदतीने १८ तास काम
चिपळूण, ता. १०ः पावसाळ्यात शहराला दिलासा मिळावा, शहराला पुराचा फटका बसू नये. शहरातील गोवळकोट परिसरातील वाशिष्ठी नदीतून काढलेला गाळ पावसाळ्यापूर्वी दुसरीकडे हलविण्यासाठी नाम फाऊंडेशनकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. नामची यंत्रणा दिवस-रात्र तब्बल १८ तास कामाला लागली आहे.
जलसंपदा विभाग, प्रशासन व चिपळूण बचाव समिती यांच्या मार्गदर्शनाखाली नाम फाऊंडेशनकडून वाशिष्ठी नदीतील पहिल्या टप्प्यातील शिल्लक गाळ उपसा व बेटे काढण्याचे काम सुरू आहे. गोवळकोट धक्का परिसरात काढलेला गाळ वाहतूक करण्यासाठी तेथेच टाकून रस्ता तयार करण्यात आला होता. पुढील महिन्यात पावसाळा सुरू होत आहे. यामुळे या ठिकाणी काढलेला गाळ पावसाळ्यापूर्वी नदीबाहेर टाकण्यासाठी नाम फाऊंडेशनकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. सध्या या भागात गाळ शिफ्टींग करण्यासाठी १८ तास अहोरात्र काम सुरू आहे. या कामासाठी नामने वाशिष्ठी नदीपात्रात ४ पोकलेन आणि १५ डंपर अशी यंत्रणा कार्यरत ठेवली आहे. वाशिष्ठी व शिवनदीतील गतवर्षी काढलेला गाळ शहरातील विविध शासकीय जागेत टाकण्यात आला. खोलगट असलेल्या या जागांमध्ये भराव करून त्याचे सपाटीकरण करण्यात आले. याशिवाय गोवळकोट येथील मैदानातही भराव करून तो विकसित करण्यात आला. या शासकीय जागांचे सपाटीकरण झाल्याने शासनाचा कोट्यवधीचा खर्च वाचला होता.

चौकट
गाळ टाकण्यासाठी जागेचा शोध
यावर्षी गाळ टाकण्यास शहरात पूररेषेबाहेर मुबलक अशा जमिनी नसल्याचे चित्र आहे. जलसंपदाच्या नियोजनात आणि महसूल विभाग व नगरपालिकेने गाळ टाकण्यासाठी पुरेशा जागा उपलब्ध करून दिल्यास एक महिन्याच्या अगोदर हे काम मार्गी लागेल, अशी आशा नाम फाऊंडेशकडून वर्तवली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com