गावठी दारू विक्री, दोघांविरुद्ध गुन्हा

गावठी दारू विक्री, दोघांविरुद्ध गुन्हा

गावठी दारू विक्री, दोघांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरीः बावनदी आणि नाणीज येथील परिसरात विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी बाळणाऱ्या दोघांविरुद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. शशिकांत विष्णू पवार (३४, रा. बावनदी, रत्नागिरी) आणि भिकाजी गोविंद पडेलकर (५५, रा. चोरवणे कांबळेवाडी संगमेश्वर, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल केलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. ही कारवाई मंगळवारी (ता.९) सकाळी अकरा व सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पथक नाणीज आणि बावनदी येथे गस्त घालत असताना त्यांना बावनदी येथील खापरेवाडीच्या पऱ्याच्या सुक्या पात्रात शशिकांत पवार हा गावठी दारू विक्री करताना निदर्शनास आला तर नाणीज-तळवाडी ते चोरवणे जाणाऱ्या रस्त्यावर एका आंब्याच्या झाडाखाली भिकाजी पडेकलर हा गावठी दारूची विक्री करताना मिळून आला. या प्रकरणी पोलिसांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी महाराष्ट्र दारू अधिनियम कायदा ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
--
पोलिसाशी गैरवर्तन; एकावर गुन्हा
खेडः धामणंद पंधरागाव विभागातील तळवटजावळी-कृष्णवाडी येथे दारूच्या नशेत पोलिसांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी एकावर येथील पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. रूपेश रवींद्र सकपाळ (३४, रा. तळवट जावळी-कृष्णवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. त्याने दारूच्या नशेत पोलिसाशी गैरवर्तन केले. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
-------
कुंभाड येथे मारहाणप्रकरणी दोघांवर गुन्हा
खेडः कुंभाड येथे किरकोळ कारणावरून शिवीगाळ व मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांवर येथील पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. संशयितांनी हातातील धारदार हत्याराने ओठावर व उजव्या डोळ्याच्या खालील बाजूस मारहाण करून दुखापत केली तसेच शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
---------
मालघरमधील तरुण बेपत्ता
चिपळूणः मालघर वाजेवाडी येथील २० वर्षीय महाविद्यालयीन तरुण महाविद्यालयात जातो सांगून सोमवारी घरातून बाहेर पडला तो अद्याप परत न आल्याने पोलिसात तो बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. ही घटना मंगळवारी घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा सिद्धार्थ अजय वाजे (२०, रा. मालघर, वाजेवाडी) हा मंगळवारी (ता. ९) मे रोजी सकाळी परीक्षा असल्याने घरडा कॉलेजला जाण्यासाठी बाहेर पडला. परशुराम घाट बंद असल्याने तो चिपळूण-गुणदे गाडीत बसून गेला; परंतु सायंकाळी तो परत आला नाही. दरम्यान, एका मित्राला सायंकाळी चारच्या दरम्यान नोट्स मेल केल्या होत्या. तो रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्याचा शोध सुरू झाला; परंतु त्याचा मोबाईलही बंद होता.
------------
नायशीत एकाचा मृतदेह आढळला
चिपळूणः येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ प्रौढाचा मृतदेह बुधवारी दुपारी साडे अकराच्या सुमारास आढळला. चिपळूण पोलिसात याबाबत अमेय भिडे यांनी माहिती दिल्यानुसार नरेश विजय चव्हाण (५५, नायशी, ता. संगमेश्वर) या फिरस्त्याचा मृतदेह मार्कंडी येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आढळला. तो हालचाल करत नसल्याने पोलिसांनी कामथे उपजिल्हा रुग्णालयात त्याला नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिस अधिक तपास करित आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com