पाणीटंचाई मुक्‍तीसाठी १३८ कोटी

पाणीटंचाई मुक्‍तीसाठी १३८ कोटी

पाणीटंचाई मुक्‍तीसाठी १३८ कोटी
माणगाव ः तालुक्‍यातील अनेक गावांचा वर्षोनुवर्षे पाणीपुरवठा आराखड्यात समावेश करण्यात येत असल्‍याने जलजीवन मिशन योजनेंतर्गत माणगावमधील अनेक गावांत वर्षभरापासून पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेण्यात आले आहेत. जवळपास १४७ योजना तालुक्‍यासाठी मंजूर झाल्या असून त्यापैकी १३७ योजनांची कामे सुरू आहेत. त्यामुळे डिसेंबर २०२अखेरपर्यंत त्‍या पूर्ण होऊन गावे संभाव्य पाणीटंचाई आराखड्यातून मुक्त होतील, अशी आशा नागरिकांना आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही तालुक्यातील गाव-वाड्यांचा संभाव्य पाणीटंचाई आराखड्यात समावेश करण्यात आली आहेत. २०२१-२२ मध्ये जलजीवन मिशनमधून अनेक गावात पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू केली करण्यात आली. यातील काही ठिकाणी विहिरीचे खोदकाम पूर्ण झाले असून जलवाहिनी टाकण्याची कामे प्रगतिपथावर आहे, तर काही ठिकाणी पंपघराचे काम पूर्ण झाले आहेत. तालुक्‍यातील ११ गावांतील योजनेतून पाणी वितरणासंदर्भात चाचणीचे सुरू आहे.
----
दुचाकी चोरणारे त्रिकुट जेरबंद
नवी मुंबई : तरुणांमध्ये क्रेझ असलेल्या महागड्या दुचाकींची चोरी करून त्याची सातारा भागात विक्री करणाऱ्या त्रिकुटाला नेरूळ पोलिसांनी जेरबंद केले आहे. या त्रिकुटाने नेरूळ भागातून २० मोटारसायकल चोरल्याचे तपासात उघडकीस आले असून गुह्यातील चोरीच्या २० दुचाकी हस्तगत करण्यात नेरूळ पोलिसांना यश आले आहे. नेरूळ पोलिसांनी अटक केलेल्या गौरव कदम (१९), निमेश कांबळे (२१) आणि प्रथमेश सपकाळ (२१) या तिघांनी रस्त्यालगत पार्क केलेल्या बुलेट, तसेच पल्सरसारख्या महागड्या गाड्या चोरी केल्या होत्या. यातील गौरव कदम हा सराईत चोरटा असून त्याने दोघा साथीदारांच्या मदतीने ही चोरी केली होती. यावेळी चोरण्यात आलेली दुचाकी त्याचे इतर मित्र सातारा भागात विकून मिळालेल्या पैशांतून मौजमजा करत होते.
---
घोसाळगडावर पाण्याचे चार हौद
रोहा ः तालुक्यात घोसाळगडावर पुन्हा एकदा ऐतिहासिक अवशेष आढळले आहेत. पाण्याच्या टाकीतील गाळ काढताना नुकतीच तोफ आणि सात तोफगोळे आढळून आले होते. आता चार पाण्याचे हौद व मानवनिर्मित गुफा आढळली आहे. घोसाळगडावर शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीने आठ वर्षांपासून संवर्धन मोहीम राबवली जात आहे. मोहिमांच्या माध्यमातून गडास गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रतिष्‍ठानच्या सदस्‍यांचा प्रयत्‍न आहे. सोमवारी गडाच्या कड्यावर चार पाण्याचे हौद आढळून आले. प्रतिष्‍ठानच्या सदस्‍यांकडून टाक्‍यांची गाळ काढून साफसफाई केली जात आहे.
--
जुन्या वाणाच्या द्राक्षांची भूरळ
तुर्भे : द्राक्षांचा हंगाम आता उतरणीला लागला आहे. अशातच बाजारात नेहमीच्या द्राक्षांसोबतच तपकिरी रंगाची द्राक्षे मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. आकाराने मोठी तसेच चवीला गोड असणाऱ्या या द्राक्षांना परदेशासह राज्यातही मागणी आहे. जानेवारीपासून सुरू होणारा द्राक्षांचा हंगाम मे-जूनपर्यंत चालतो. त्यानुसार बाजारात हिरवी, पिवळी आणि काळी द्राक्षे मोठ्या प्रमाणात येतात. नाशिक, तासगाव नगर आणि अगदी सोलापूरमधून ही द्राक्षे मुंबईतील बाजारपेठांमध्ये दाखल होत असतात. यात आकाराने लांब असणारी सोनाक्का, शरद सीडलेस अशा विविध जातींची द्राक्षे नेहमीच पाहायला मिळतात. मात्र, बाजारात परदेशातील द्राक्षे बाजारात पाहायला मिळतात.
-----
बोटीला आग लागल्याने नुकसान
रेवदंडा ः खंडेराव -थेरोंडामधील दयानंद जंगली (४६) यांच्या मालकीची नारायणी नावाच्या फायबर मच्छीमारी बोटीला खंडेराव समुद्रकिनारी अचानक आग लागली. यात बोटीचे इंजिन व मासे पकडण्याची नायलॉन जाळी असे एक लाख ५०० रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार जंगली यांनी रेवदंडा पोलिस ठाण्यात दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com