माहिती अधिकाराचा वापर करा

माहिती अधिकाराचा वापर करा

18 (पान 2 साठी, संक्षिप्त)


-rat11p3.jpg ः
23M02055
सावर्डे ः माहितीचा अधिकार या विषयी आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना सुभाष बसवेकर.
---

माहिती अधिकाराचा वापर करा ; बसवेकर

सावर्डे ः नागरिकांनी आपले हक्क व जबाबदारी मिळण्यासाठी माहिती अधिकार या माध्यमाचा वापर करावा, असे आवाहन सुभाष बसवेकर यांनी केले.
माहिती, अधिकार, सत्य आणि संधी याविषयी सावर्डे महाविद्यालयात ते बोलत होते. सह्याद्री शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी महेश महाडिक यांनी सुभाष बसवेकर यांचे स्वागत केले. प्रत्येक नागरिकाला शासनदरबारी आपली मागणी माहिती अधिकाराच्या माध्यमातून मागता येते. तिथे कोणत्याही वयाचा, जातीचा, धर्माचा विषय नसून गावपातळी ते देशपातळीपर्यंत आपल्याला जी काही आवश्यक माहिती शासनाकडून हवी असेल ती वरील माध्यमातून प्राप्त करता येते. माहितीच्या अधिकार कायद्यामुळे शासकीय कामकाजामध्ये पारदर्शकता येत असून, त्याचा योग्य तो वापर नागरिकांनी करावा, असे आवाहन सुभाष बसवेकर यांनी केले.
---

पालवणीत चौरंगी कबड्डी स्पर्धा

मंडणगड ः मंडणगड तालुक्यातील पालवणी-गवळीवाडी येथे 13 मे रोजी श्रीकृष्ण विकास मंडळ पालवणी गोकुळवाडी यांच्यावतीने खुल्या गटाच्या चौरंगी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भगवान श्रीकृष्ण मंदिराचा आठवा वर्धापन दिन 14 मे रोजी असून या निमित्ताने पूजा, भंडारा, स्वागत समारंभ आदी कार्यक्रम होणार आहेत. वाडीतील मुबंईकर चाकरमानी व स्थानिक ग्रामस्थांच्या एकजुटीवर ऐतिहासिक कबड्डीच्या स्पर्धा या खेळवल्या जाणार आहेत. या अद्भुत कबड्डी खेळासाठी मुंबईसह तालुक्यातील संघ खेळवले जाणार आहेत. आकर्षक चषक व रोख रक्कम, पारितोषिके असे या कबड्डी खेळाचे वैशिष्ट्य असणार आहे.
--

शास्त्री हाययस्कूल च्या माजी विद्यार्थी मंचाचे स्नेहसंमेलन

मंडणगड ः लालबहादूर शास्त्री हायस्कूल दहागाव येथील माजी विद्यार्थीमंचाचा आठवा स्नेहमेळावा 13 मे रोजी दहागाव येथे आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त शाळेच्या महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून मंचाच्यावतीने साकारलेल्या बंदिस्त सभागृहाचे लोकार्पण आणि माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचे क्रिकेट सामने होणार आहेत. 13 आणि 14 मे रोजी आयोजित सोहळ्याला सर्व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला लालबहादूर शास्त्री हायस्कूचे माजी मुख्याध्यापक अभंग, प्रमुख पाहुणे आर. व्ही. हिरेमठ, डॉ. चंद्रशेखर निमकर, मंडणगड तालुका विकास संस्थेचे ॲड. विनोद दळवी उपस्थित राहणार आहेत.
--

सह्याद्री हॉटेल मॅनेजमेंटचे
नोकरी देण्याचे उद्दिष्ट पूर्ण

सावर्डे ः सह्याद्री शिक्षणसंस्थेचे सह्याद्री कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयाने शैक्षणिक वर्ष 2022-23च्या टीवायबीएस्सीच्या विद्यार्थ्यांना आयबीआयएस बेंगलुरू, ग्रॅंड मर्क्युर, विट्स मुंबई, ओ हॉटेल पुणे, नोवोटेल मुंबई, फर्न पालघर, इवेन्यू पुणे या पंचतारांकीत हॉटेल इंडस्ट्रीमध्ये शिक्षण पूर्ण होताच विद्यार्थ्यांना नोकरी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सह्याद्री शिक्षणसंस्थेचे सह्याद्री कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयाने एफवायबीएस्सी हॉस्पिटॅलिटी स्टडीजला प्रवेश घेतेवेळी 100 टक्के नोकरी देणार असे आश्वासन देण्यात आले होते. 100 टक्के नोकरी दिल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी संस्थेचे आभार मानले आहेत. आमदार शेखर निकम, संस्थेचे सेक्रेटरी महाडिक, महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष प्रशांत निकम, संस्थेचे सर्व संचालक मंडळ, प्राचार्य व कर्मचारी, प्राचार्य हिदायत अली शेख आदींनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com