हडी-बौद्धवाडीत आजपासून अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा

हडी-बौद्धवाडीत आजपासून अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा

हडी-बौद्धवाडीत आजपासून
अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा
मालवण, ता. १२ : भीमरत्न क्रीडा मंडळ व संजय कदम मित्रमंडळ यांच्यावतीने हडी-बौद्धवाडी येथे शनिवारी (ता. १३) व रविवारी (ता. १४) ला दोन दिवसीय नाईट बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेतील विजेत्या संघास ७ हजार रुपये, आकर्षक चषक, उपविजेत्या संघास ५ हजार रुपये, आकर्षक चषक तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेसाठी ७०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली नावे प्रज्वल कदम, तुषार कदम, रत्नदीप कदम, निनाद कदम यांच्याकडे नोंदवावीत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
----------
ओसरगाव येथे आज कार्यक्रम
कणकवली, ता. १२ः श्री विठ्ठल रखुमाई मंदिर ओसरगावचा वर्धापन दिन सोहळा उद्या (ता. १३) साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी ८ वाजता विधीवत पूजा, त्यानंतर सत्यनारायण महापूजा, तीर्थप्रसाद, दुपारी ३ वाजता मुलांच्या विविध स्पर्धा होणार आहेत. यात रंगभरण व संगीत खुर्ची या स्पर्धांचा समावेश आहे. सायंकाळी सहा वाजता भजने, सात वाजता महाप्रसाद, साडेसात वाजता बक्षीस वितरण समारंभ, रात्री आठ वाजता वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचा पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे.
-------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com