गुरूजनांमुळेच बालसाहित्‍यिकांना दिशा
गुरूजनांमुळेच बालसाहित्‍यिकांना दिशा

गुरूजनांमुळेच बालसाहित्‍यिकांना दिशा गुरूजनांमुळेच बालसाहित्‍यिकांना दिशा

02340
तिवरे : येथील तिवरे प्राथमिक शाळा नंबर १ च्या विद्यार्थ्यांचा ‘ज्ञानवेध’ हा साहित्य विशेषांक कवी अजय कांडर यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. यावेळी शांताराम सावंत, रामदास आंबेलकर, दीक्षा कदम, निशा चव्हाण, विजय परब, संतोष वाळवे आदी उपस्थित होते.


गुरूजनांमुळेच बालसाहित्‍यिकांना दिशा

कवी अजय कांडर; तिवरे शाळेत ‘ज्ञानवेध’चे प्रकाशन

कणकवली, ता.१२ : बहुसंख्य विद्यार्थ्यांकडे लेखन गुणवत्ता असते; परंतु त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे गुरुजनही लाभावे लागतात. तिवरे प्राथमिक शाळेतील साहित्य लेखन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे शिक्षक लाभल्यामुळेच त्यांची बालवयात साहित्यिक म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर प्राथमिक शाळांना हा एक आदर्शच आहे, असे प्रतिपादन नामवंत कवी अजय कांडर यांनी तिवरे येथे केले.
तिवरे प्राथमिक शाळा नंबर १ च्या विद्यार्थ्यांचा ‘ज्ञानवेध’ हा साहित्य विशेषांक कवी अजय कांडर यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या प्रकाशन सोहळ्याला शांताराम सावंत (केंद्रप्रमुख), रामदास आंबेलकर (शाळा स.अध्यक्ष), दीक्षा कदम, निशा चव्हाण (ग्रामपंचायत सदस्य), विजय परब, संतोष वाळवे, दीपिका सुतार, मीरा आंबेलकर, नमिषा म्हाडेश्वर, राजश्री गुरव, पूजा वाळवे, मैथिली वाळवे, जाधव, मुख्याध्यापक विजय शिरसाट, शिक्षक संदीप कदम, विजय मेस्त्री, हेमंत राणे, अंगणवाडी सेविका करुणा आंबेलकर आदी उपस्थित होते.
केंद्र प्रमुख शांताराम सावंत म्हणाले, मागील नऊ वर्षे तिवरे प्राथमिक शाळा विद्यार्थी साहित्य विशेषांक प्रसिद्ध करत आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या साहित्य लेखनाला प्रेरणा मिळाली असून महाराष्ट्रातील विविध बाल साहित्य उपक्रमांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. त्याचबरोबर या शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रातिनिधिक कवितासंग्रह प्रकाशित झाला असून त्याला मान्यवरांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे.
दरम्यान, याच कार्यक्रमात शाळेचे वार्षिक पारितोषिक वितरणही झाले. गौरविलेले विद्यार्थी असे ः आदर्श विद्यार्थी-श्रवण वाळवे, आदर्श विद्यार्थिनी-समीक्षा गोसावी- शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण गौरव - समीक्षा विजय गोसावी, वैष्णवी गोपाळकृष्ण सुतार, समीक्षा संतोष चव्हाण, श्रवण प्रसाद वाळवे, रोशन संतोष वाळवे, अनुश्का महेश वाळवे, सावली सुहास वाळवे, मयुरेश राजाराम गुरव-क्रीडा सन्मान -चैताली आंबेलकर, वक्तृत्व सन्मान-समीक्षा चव्हाण. निबंध स्पर्धा सन्मान-वैष्णवी सुतार,काव्य स्पर्धा सन्मान-रिया परब.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com