-चिपळूण मध्यवर्ती बसस्थानक बनले समस्यांचे आगार

-चिपळूण मध्यवर्ती बसस्थानक बनले समस्यांचे आगार

२५ (पान २ साठी, सेकंड मेन)


-rat१२p२२.jpg ः
२३M०२३४५
चिपळूण ः मध्यवर्ती बसस्थानकावर प्लास्टिकच्या बाटल्यांचा असा खच साचलेला आहे.
-rat१२p२३.jpg ः
२३M०२३४६
प्लास्टिकच्या पिशव्याही दैनंदिन उचलल्या जात नाहीत.
----

चिपळूण बसस्थानक बनले समस्यांचे आगार

पिण्याच्या पाण्याची गैरसोय ; कचऱ्याची समस्या गंभीर

चिपळूण, ता. १२ ः चिपळूण शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाचे काम अर्धवट स्थितीत आहे. त्यातच नवनवीन समस्यांना प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे चिपळूणचे बसस्थानक समस्यांचे आगार बनले आहे. एसटीने प्रवास करणाऱ्या महिला, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना तिकिटात सवलत मिळते. त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढली आहे; मात्र हे प्रवासी कायम टिकवून ठेवण्यासाठी त्यांना सुविधा देणे गरजेचे आहे; मात्र प्रवाशांना सुविधा पुरवण्यात चिपळूण आगार अपयशी ठरले आहे.
चिपळूण बसस्थानकाचे काम गेली अनेक वर्षे अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे स्थानिकात महिला कक्ष, पास वितरण विभाग, वाहतूक नियंत्रण कक्ष, महिला विश्रांतीगृह, स्वच्छतागृह, शुद्ध पेयजल आदी सुविधा असून नसल्यासारख्या आहेत. आगारात या सुविधा तात्पुरत्या स्वरूपात निर्माण केल्या असल्या तरी त्याची देखभाल केली जात नाही. आगारात पुरुष व महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारली आहेत. पुरुषांसाठी असलेल्या स्वच्छतागृहात स्वच्छतेचा अभाव असल्याने येथे सातत्याने दुर्गंधी येत आहे. येथील अनेक साहित्यांची तोडफोड झाली आहे. तेथे प्लास्टिक व काचेच्या बाटल्या सर्वत्र आढळतात. त्यामुळे स्वच्छतागृह केवळ नावाला उरले आहे. आगारात जागोजागी कचरा साचलेला असतो. प्रवाशांकडून होणारा कचरा जमा करण्यासाठी विश्रांतीकक्षात बॉक्स ठेवलेले आहेत. यातील कचरा नियमित उचलला जात नाही.
बसस्थानकात प्रवाशांसह चालक-वाहकांच्या सोयीसाठी येथे शुद्ध पेयजल घटकाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या पाण्याची सोय झाली होती; मात्र देखभाल दुरुस्तीअभावी हे शुद्ध पेयजल घटक काही दिवसातच बंद झाले. दुसरीकडे बाटलीबंद पाणी विकणारे नवीन स्टॉल तयार झाले आहेत. तेथे दिवसा शेकडो बाटल्यांची विक्री सुरू आहे.
--
कोट
एसटी स्थानकावरील स्वच्छतेमध्ये सातत्य राखण्यासाठी ठेकेदाराला सक्त सूचना केल्या आहेत. सुट्ट्यांमुळे प्रवासी वाढले आहेत. त्यांची गैरसोय झाली तर कंत्राटदाराला दंड केले जाईल. सफाई कामगार किती कामावर येतात? ते वेळेवर येतात की नाहीत यावरही आमची आता नजर असणार आहे.
- रणजित राजेशिर्के, आगारप्रमुख, चिपळूण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com