मळणगावात ३८ लाखांची
दारू जप्त, एकजण ताब्यात
कंटेनर मळगावात पकडला

मळणगावात ३८ लाखांची दारू जप्त, एकजण ताब्यात कंटेनर मळगावात पकडला

मळणगावात ३८ लाखांची
दारू जप्त, एकजण ताब्यात
सावंतवाडी, ता. १२ः गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी येथील पोलिसांनी राजस्थान येथील एकाला ताब्यात घेतले. पारस अमिदाराम जाठ (वय २३, रा. बारनेर) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून ३८ लाखांच्या दारूसह कंटेनर असा ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई आज दुपारी बाराच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर मळगाव-ब्राह्मणवाडी येथे करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः मळगाव-ब्राह्मणवाडी येथील रस्त्याच्या कडेला एक कंटेनर बंद अवस्थेत उभा होता. तो संशयास्पद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पाहणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीची दारू सापडली. ती जप्त करण्यात आली. ही कारवाई प्रभारी पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, पी. के. कदम, एस. बी. गलोले, आर. आर. साटेलकर यांनी केली. संशयितास उद्या (ता.१३) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com