खडपोली, अलोरेतील नद्यांवरील पुलांच्या रुंदीकरणाची मागणी

खडपोली, अलोरेतील नद्यांवरील पुलांच्या रुंदीकरणाची मागणी

५ (पान ३ साठी)

rat१३p४.JPG ः
२३M०२५५४
चिपळूण ः अरूंद पिंपळी पुलावर वाढत्या वाहतुकीमुळे होणारी वाहतूककोंडी.
--------------
नद्यांवरील पुलांचे रुंदीकरण करा

मुराद अडरेकर ; खडपोली, अलोरे ; दळणवळणाच्यादृष्टीने उपयुक्त

चिपळूण, ता. १२ ः तालुक्यातील खडपोली व अलोरे गाव व्यावसायिक व औद्योगिकदृष्टीने महत्वाची असून तेथील नद्यावरील पूल हे दळणवळणाच्यादृष्टीने फारच उपयुक्त आहेत. २००७ ते २२च्या पूरहानीदरम्यान या पुलांवरून ७ ते १० फूट पाणी गेले आहे. त्या काळी तुटपुंजी दुरुस्ती करून त्यावरील वाहतूक सुरू राहिली. या मार्गावरील वाढत्या वाहतुकीमुळे पुलांची उंची वाढवून त्याचे रूंदीकरण करावे, अशी मागणी खडपोली येथील सामाजिक कार्यकर्ते मुराद अडरेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
पिंपळी नांदिवसे मार्गावरील २३/१०० हा पूल औद्योगिक वसाहतींसाठी फारच महत्वाचा आहे. गुहागर-विजापूर मार्गावर काही अडचण किंवा मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण शहर आणि परशुराम घाटादरम्यान काही अडचण झाल्यास पर्यायी मार्ग तसेच पिंपळी ते तिवरे, नांदिवसे मार्गावरील सुमारे १०-१२ प्रमुख गावांना औद्योगिक वासहतीसह जोडणारा प्रमुख पूल आहे.
हा पूल सध्या नादुरुस्त स्थितीत आहे. औद्योगिक वसाहतींची प्रमुख पाण्याचा पुरवठा करणारी जलवाहिनी या पुलावरून जाते. पादचाऱ्यांना चालतानाही येथे अडचणी येतात. पुलाखालील गाळामुळे नदीचे पात्र बदलले असून, नदीच्या बाजूला व पुलाच्या शेवटच्या दोन्ही टोकांना पाण्याच्या प्रवाहाचा धोका निर्माण झाला आहे. गुहागर-विजापूर महामार्गावर असलेल्या पेढांबे-अलोरे मार्गावरील २८/२०० येथील पूल हा ४ था टप्पा वीजनिर्मिती केंद्र, तेथील वसाहत, कोळकेवाडी धरण व या मार्गातील प्रमुख गावांसाठी महत्वाचा आहे. गुहागर-विजापूर महामार्ग घाटमाथापर्यंत बंद झाल्यास पर्यायी मार्ग व दळणवळणाच्यादृष्टीने फारच महत्वाचा आहे. हा पूलदेखील अरुंद असून त्याची उंचीदेखील कमी आहे. एकेरी वाहतूक होतानाही पादचारी चालू शकत नाही, अशी स्थिती आहे. या दोन्ही पुलांसाठी सातत्याने मागणी झाली तरी त्याकडे निधीची उपलब्धता नसल्याचे कारण दिले जाते. दोन्ही पुलाचे बांधकाम होण्याबाबत त्वरित कार्यवाही करावी. जुलैअखेर पुलाचे काम चालू न झाल्यास पिंपळी-नांदिवसे मार्गावर आपण आत्मदहनासारखा टोकाचा निर्णय स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी घेणार आहोत, असा इशाराही अडरेकर यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com