मुख्य रस्त्यावर रंबलर स्ट्रीप, पांढरे पट्टे

मुख्य रस्त्यावर रंबलर स्ट्रीप, पांढरे पट्टे

२२ (पान ५ साठी)

-rat१३p१५.jpg-
२३M०२५६६
रत्नागिरी ः आरोग्यमंदिर येथे रस्त्यावर भरपूर वर्दळ असल्याने पांढरे पट्टे मारण्याचे काम सुरू आहे.
---
रत्नागिरीतील मुख्य रस्त्यावर रंबलर स्ट्रीप

रत्नागिरी, ता. १३ ः रत्नागिरी शहरात मुख्य रस्त्यांवर तीन ठिकाणी वर्दळीमुळे अपघातांची जास्त शक्यता असल्याने तिथे गतिरोधक व्हावेत, अशी मागणी भारतीय जनता युवामोर्चाचे शहर सरचिटणीस प्रवीण देसाई यांनी केली होती. त्यांच्या मागणीला यश आले असून, हा महत्वाचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे शहरात मुख्य रस्त्यांवर रंबरल स्ट्रीप व पांढरे पट्टेसुद्धा मारण्यात येत आहेत.
डिसेंबर २०२२ मध्ये देसाई यांनी रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. पादचारी व वाहनचालक नागरिकांच्या सुरक्षेसाठी गतिरोधक असण्याची गरज मांडली होती. याबाबत त्यांनी निवेदन भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, पोलिस अधीक्षक यांनाही पाठवले होते.
रत्नागिरी शहराला जोडणारा मुख्य रस्ता साळवी स्टॉपपासून सुरू होतो. या प्रमुख मार्गावर तीन जास्त वर्दळीची ठिकाणे आहेत. शिवाजीनगर उतार, शिवाजीनगर येथे हिंद सायकल मार्टशेजारी व आरोग्यमंदिर या ठिकाणी शाळेतील मुले, ज्येष्ठ नागरिक यांची वर्दळ जास्त प्रमाणात असते. त्यामुळे येथे रस्ता पार करताना खूपच धावपळ उडते आणि येथे अपघात होऊ शकतो. त्यामुळे गतिरोधकांची गरज देसाई यांनी मांडली होती. या मागणीची तत्काळ दखल घेत यावर निर्णय घेऊन रंबलर स्ट्रीप व पांढरे पट्टे मारण्याच्या कामाला काही दिवसांपूर्वी प्रारंभ झाला. यामुळे रस्ता ओलांडताना ज्येष्ठ नागरिक, मुले, महिलांना सोयीचे होणार आहे. तरीही आरोग्यमंदिर येथे रबर मोल्डेड स्पीडब्रेकर व्हावा, यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. वाहनचालक तसेच पादचाऱ्यांनी नीट सांभाळूनच रस्ता ओलांडावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com