मंडणगड - लग्नसराई, महापुजा, स्पर्धेतून कोटींची उलाढाल

मंडणगड - लग्नसराई, महापुजा, स्पर्धेतून कोटींची उलाढाल

- Rat१४p१९.jpg ःKOP२३M०२८३६ मंडणगड ः घराच्या अंगणात मांडवात लग्नातील एक प्रसंग.

लग्नसराई, महापुजा, स्पर्धेतून कोटींची उलाढाल
मंडणगडात जोर ; क्रिकेट स्पर्धांच्या आयोजनावरही खर्च
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १४ ः तालुक्यात १०८ गावात मे महिन्यात लग्नसराई, विविध स्पर्धा आणि महापुजांचे आयोजन करण्यात आले असून, त्यावर कोटींची उलाढाल होणार आहे. लग्नघटिका आणि पूजेच्या वेळा साधताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक गावांत सध्या क्रिकेट स्पर्धांचे फॅड आले असून, त्यात बक्षिसांची खैरात सुरू आहे.
वैशाख महिन्यात अनेकजण सुट्ट्या पाहून नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न सोहळ्यांचे आयोजन करतात. सध्या तालुकाभर लग्नसराईचे दिवस आहेत. प्रत्येक गावात किमान दोन लग्न ठरलेलीच आहेत. १०८ गावे व दोनशेहून अधिक वाडीवस्तींचा मंडणगड तालूक्यात लग्नसराईची धावपळ सूरु आहे.
लग्नामध्ये दागिने खरेदी, जेवण, बस्ता यावर मोठ्याप्रमाणात खर्च केला जातो. प्रत्येक गावातील ग्रामस्थ मुंबईकरांच्या उपस्थितीत श्री सत्यनारायण व विविध महापुजांचे आयोजन करतात. त्या निमित्ताने नाटक, ऑर्केस्ट्रा, कव्वाली असे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रमही केले जातात. त्यावरही मोठा खर्च होतो. महिनाभर चालणाऱ्या या कार्यक्रमांसह तालुक्यात क्रिकेट, कबड्डी स्पर्धा सुरू आहेत. त्यात रोख रकमेची बक्षिसे असतात. त्यामुळे मंडणगड तालुक्याचा हा मे महिना कोटीची उलाढाल करणारा ठरत आहे. यात समाजोपयोगी कार्यक्रमांचाही समावेश असून, त्यात मात्र आर्थिक उलाढाल होत नाही. त्यामुळे कोटींचा ठरलेला तालुका सामाजिक कार्यात खर्च करण्यास कमी पडत असल्याची खंत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com