संक्षिप्त

संक्षिप्त

फोटो
- rat१४p२१.jpg- KOP२३M०२८५३ डॉ. अजित थोरबोले

दापोलीचे उपविभागीय अधिकारीपदी
डॉ. अजित थोरबोले यांची नियुक्ती
दाभोळ : दापोलीचे उपविभागीय अधिकारी शरद पवार यांची सिंधुदुर्ग येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी डॉ. अजित थोरबोले यांची बदली करण्यात आली आहे. डॉ. थोरबोले यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. दापोलीचे उपविभागीय अधिकारी या पदाचा कार्यभार स्विकारलेले डॉ. अजित थोरबोले हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१४ च्या बॅचचे अधिकारी असून त्यांनी बीएएमएस ही वैद्यकीय क्षेत्रातील पदवी मिळविली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा हे त्यांचे मूळ गाव असून त्यांनी नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधार येथे प्रांत अधिकारी, नंदुरबारचे उपजिल्हाधिकारी, जळगाव जिल्ह्यातील फैजापूर येथे उपविभागीय अधिकारी तसेच अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेडचे उपविभागीय अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे.

- rat१४p२३.jpg-KOP२३M०२८५५
दापोली : येथील बसस्थानकात धोकादायक झालेले जाहिरात फलक लावण्यासाठी उभारण्यात आलेले लोखंडी खांब

दापोली बस स्थानकाच्या आवारातील
लोखंडी खांब कोसळण्याच्या स्थितित

दाभोळ : दापोली बस स्थानकाच्या आवारात जाहीरातींचे फलक लावण्यासाठी उभे केलेले लोखंडी खांब कधीही कोसळण्याच्या स्थितित आहेत. ते प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण करणारे असून एसटी महामंडळ हे खांब पडून अपघात होण्याची तर प्रतीक्षा करत नाहीना असा सवाल प्रवासी वर्गातून केला जात आहे. दापोली शहराच्या मोक्याच्या ठिकाणी बस स्थानक आहे. या स्थानकातून ग्रामीण भागात तसेच मुंबई, ठाणे, पूणे, कोल्हापूर अशा ब पल्याच्या ठिकाणी जाण्यासाठी बसेस सुटतात. त्यामुळे बसस्थानकात प्रवाशांची दिवसभर गर्दी असते. जाहिरातीपासून एसटी महामंडळाला उत्पन्न मिळावे यासाठी या बसस्थानकाच्या दोन बाजूंना जाहिरातीचे फलक लावण्यासाठी लोखंडी खांब उभे करण्यात आले आहेत. हे खांब आता जुने झाले असून त्यातील काही वाकलेले आहेत त्यावरील लोखंडी चॅनलचे अॅंगल तुटलेल्या स्थितीत आहेत तर काही उभे केलेले चॅनल हे अधांतरीतच आहेत. या चॅनलच्या सुटलेल्या लोखंडी पट्टया प्रवाशांच्या अंगावर पडण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com