विनायक राऊत

विनायक राऊत

02859

मालवणी महिलेच्या
हाताची चव जगात न्यारी
विनायक राऊत : मिरग महोत्सवाला दिली भेट
कनेडी, ता. १४ ः भिरवंडे विकास सेवा संस्थेचा आगळावेगळा उपक्रम असून मिरग महोत्सवांमध्ये बचत गटांच्या उत्पादित वस्तूला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी चांगले प्रयत्न केले. या महोत्सवांमध्ये महिलांनी सागोती- वडे, शेवया- रस आणि घावणे अप्रतिम बनवले होते. मालवणी महिलेच्या हाताला जी चव आहे, ती जगात कुठल्याही महिलेच्या हाताला नाही, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केले. भिरवंडे विविध कार्यकारी सेवा सोसायटी आयोजित मिरग महोत्सवाला खासदार विनायक राऊत यांनी आज येथे भेट दिली.
येथील समाधी पुरुष सभागृहाच्या समोरील मोकळ्या जागेमध्ये शनिवारपासून सुरू झालेल्या मिरग महोत्सवाला आज दुपारी खासदार यांनी भेट देऊन महिलांच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. शिवसेना सहसंपर्क प्रमुख अतुल रावराणे, जिल्हा बँकेचे संचालक सुशांत नाईक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत कन्हैया पारकर, सचिन सावंत, मंगेश सावंत, अध्यक्ष बेनी डिसोजा आदी उपस्थित होते. संस्थेच्या वतीने खासदार राऊत यांचा सत्कार अध्यक्ष बेनी डिसोजा यांनी केला. महिलांनी उत्पादित केलेल्या विविध पदार्थांची चव खासदार राऊत यांनी चाखली. त्यानंतर महिलांना मार्गदर्शन करताना नमूद केले की, भिरवंडे संस्थेचा उपक्रम जिल्ह्यात आगळावेगळा आहे. महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून वस्तू उत्पादित करून त्याची विक्री करण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली. खऱ्या अर्थाने हा उपक्रम सर्व ठिकाणी राबवून. प्रत्येक गावांमध्ये महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी चांगली संधी आहे. अशा या नावीन्यपूर्ण संकल्पनेचा उपयोग इतर गावांमध्ये होणे अपेक्षित आहे. संचालक तुषार सावंत यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com