रत्नागिरी  ः बसमतमधील हळदीप्रक्रिया केंद्राचे उपकेंद्र दापोलीत

रत्नागिरी ः बसमतमधील हळदीप्रक्रिया केंद्राचे उपकेंद्र दापोलीत

हळदीप्रक्रिया केंद्राचे दापोलीत उपकेंद्र
देवेंदर सिंह; रत्नागिरी विमानतळासाठी २७ हेक्टर संपादित
रत्नागिरी, ता. १४ ः बसमत येथील हळदीप्रक्रिया केंद्राचे उपकेंद्र दापोली कोकण कृषी विद्यापिठात सुरू करण्यात येणार आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रत्नागिरी विमानतळाच्या टर्मिनलसाठी२७ हेक्टर जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. त्यासाठी ७० कोटींच्या मोबदल्याचे वाटप करण्यात आल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, ‘रत्नागिरी विमानतळासाठी गेल्या ३ महिन्यांपासून सुरू असलेली भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली. २७ हेक्टरचे भूसंपादन करण्यात आले. त्यातील सुमारे ३०० लाभार्थ्यांना ७० कोटींच्या मोबदल्याचे वाटप झाले. गुंठ्याला सुमारे ४० हजार रुपये देण्यात आला.भूसंपादाने ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.
ते म्हणाले, ‘आपत्ती सौमिकरण योजनेतून भूमिगत विद्युतवाहिन्या, धूपप्रतिबंधक बंधारे, शेल्टरहाऊसची कामे केली जात आहेत. ७०३ कोटींचा निधी या कामांसाठी मंजूर झाले आहेत. ८५० कोटीचा आराखडा सादर करण्यात आला होता. नुकसानग्रस्त प्राथमिक शाळांसाठी ५ कोटीचा निधी गोळा करण्यात येणार आहे. विविध कंपन्यांच्या सीआरएस फंडातून हा निधी घेतला जाणार आहे. त्यापैकी आता १ कोटीचा निधी प्राप्त झाला. हा निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आला आहे. आपत्ती योजनेतून जिल्ह्यात ३३ बंधाऱ्यांसाठी १५४ कोटी, भूमिगत वाहिन्यांसाठी ३०० कोटी, १६ निवारा केंद्रांसाठी २५० कोटीचा निधीचा समावेश आहे, असे सिंह यांनी सांगितले.
शासनाच्या सलोखा योजनेतून जिल्ह्यातील ८० शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यापैकी ४० शेतकऱ्यांचा जमीन अदलाबदलीची प्रक्रिया सुरू असून १० जणांची पूर्ण झाल्याने त्यांच्या नावे सातबारा करून देण्यात आला.तर जातपडताळणी विभागाकडे प्रलंबित असलेल्या विविध दाखल्यांबाबत मंडणगड पॅटर्न राबवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी लागणाऱ्या दाखल्यासंह अन्य दाखले तत्काळ दिले जाणार आहेत. आतापर्यंत १ हजार १०७ दाखल्यांचे वाटप झाले आहे; परंतु रत्नागिरी जातपडताळणी कार्यालयात दाखले प्रलंबित राहात असतील तर त्याबाबत माहिती घेऊन पुढील कार्यवाही करू, असे सिंह यांनी सांगितले.
गाव तिथे स्मशान आणि दफनभूमी योजना आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १ हजार २३८ गावांमध्ये १ हजार ९३५ स्मशान व दफनभूमी आहेत. ३३२ ठिकाणीची मोजणी झाली असून, त्याची नोंद कागदावर आणली आहे. तहसीलदारांमार्फत ही कार्यवाही होणार आहे तसेच गावठाण जमिनीची मोजणी करण्यात येणार आहे. त्यापैकी आतापर्यंत ३९५ ठिकाणची मोजणी पूर्ण झाली आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.


जिल्ह्यात ४०० गावांमध्ये नेटवर्कची समस्या
जिल्ह्यातील बीएसएनएलची ४जी सेवा सुरू करण्यासाठी १९१ नवीन टॉवर बसवण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ८१ ठिकाणी मोफत शासकीय जमीन दिली तर दोन दिवसात हे उद्दिष्ट १००च्या वर जाईल; मात्र अजूनही जिल्ह्यातील ४०० गावांमध्ये नेटवर्कची समस्या आहे. त्या ठिकाणी टॉवर उभारण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. शासकीय जमीन मिळाली नाही तर खासगी जमीन भाड्याने घेऊन बीएसएनएल कंपनी ४जी सेवा देणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com