खेड आगाराने दहा दिवसात कमावले एक कोटी

खेड आगाराने दहा दिवसात कमावले एक कोटी

पान ३ साठी

दहा दिवसांत कमावले एक कोटी
खेड आगार; सर्वाधिक महिलांची पसंती; ८ मे रोजी विक्रमी कामगिरी

दृष्टिक्षेपात
मे महिन्याच्या पहिल्याच ११ दिवसात भरारी
९२ हजार ३१० महिलांनी केला प्रवास
२ लाख १३ हजार ११० प्रवाशांची वाहतूक
११ लाख ५२हजार ८०० रुपयांचे उत्पन्न

खेड, ता. १४ : कोरोना काळात प्रवासी संख्या घटल्याने मोठा फटका बसलेल्या एस. टी. महामंडळाच्या खेड आगाराने अवघ्या दहा दिवसात एक कोटीचे उत्पन्न मिळवत पुन्हा भरारी घेतली आहे. सर्वाधिक उत्पन्न आणि प्रवाशी वाहतूक ही ८ मे या एकाच दिवशी करून महामंडळाच्या खेड आगाराने पुन्हा एकदा आपले गतवैभव प्राप्त करण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
गेली ७५ वर्ष अखंड सेवा देणाऱ्या एसटीची चाके कोरोना आणि एस टी च्या संपामुळे थांबली होती. संपूर्ण महाराष्ट्रात एस टी बंद होत्या, नंतर हळूहळू एस टी पूर्व पदावर येत असताना संपामुळे पुन्हा एसटीची सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. त्यांतून प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली होती. सर्व कटुप्रसंगांना मागे सोडत त्यानंतर नव्या उमेदीने एसटीने पुन्हा सुरुवात केली. सध्या सुरु असलेल्या मे महिन्याच्या सुट्टी आणि लग्नाच्या हंगामामुळे कोकणात प्रवाशांची रेलचेल वाढली आहे. कोरोनामुळे गावी सुट्टीसाठी येणारा चाकरमानी दोन वर्ष रखडला होता. आता मे महिन्याच्या पहिल्याच ११ दिवसात एसटीच्या खेड आगाराने फिनिक्स भरारी घेतली आहे. तब्बल दोन लाख तेरा हजार एकशे दहा लोकांची वाहतूक करून एक कोटी तीन लाख एकोणअंशी हजार दोनशे पंचेचाळीस रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले आहे. सर्वाधिक उत्पन्न ता. ८ मे या एकाच दिवशी विक्रमी प्रवाशी वाहतूक करून अकरा लाख बावन्न हजार आठशे अंशी रुपयांचे उत्पन्न खेड आगाराने मिळवले आहे. या अकरा दिवसात ब्याण्णव हजार तीनशे दहा महिलांनी तर दहा हजार एकोणसत्तर अमृत जेष्ठ नागरिकांनी प्रवास केला आहे. महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या दोन क्रांतिकारी निर्णयामुळे एस टीच्या प्रवासी संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. तर एसटीचे अधिकारी कर्मचारी, चालक वाहक यांच्यामुळे हे उत्पन्न गाठणे शक्य झाले असल्याची माहिती येथील आगर व्यवस्थापक नंदकुमार जाधव यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com