खारेपाटण ते बोरवली बस सेवा

खारेपाटण ते बोरवली बस सेवा

10 (टुडे पान 1 साठी, संक्षिप्त)

खारेपाटण ते बोरिवली एसटी सेवा 20 पासून

राजापूर ः तालुक्यातील तळगाव ग्रामविकास मंडळ (रजिस्टर्ड) मुंबई व ग्रामपंचायत तळगांव यांच्यावतीने तळगांव, मोसम, शेजवली, पन्हाळे, कोंड्ये, हातिवले या गावातील जनतेच्या तसेच मुंबईकर चाकरमान्यांच्या सोयीसाठी खारेपाटण ते बोरिवली अशी एसटी सेवा शनिवार (ता. 20) मे पासून सुरू करण्यात येणार आहे. मुंबई उपनगरातील लोकांना होळी, शिमगोत्सव, मे महिना व गणपती उत्सवादरम्यान गावी जाण्यासाठी काही वेळेला खासगी बसने प्रवास करावा लागतो. खासगी बसचा प्रवास हा एसटी बसच्या प्रवासापेक्षा जास्त महाग पडतो. मंडळाचे सदस्य अरविंद सावंत यांनी अशी बस सुरू करावी, अशी मागणी मंडळाकडे केली होती. याची दखल तळगांव ग्रामविकास मंडळाने घेऊन तळगांवचे सरपंच रमेश सूद यांच्या माध्यमातून खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार कणकवली-खारेपाटण व्हाया तळगांव राजापूर ते भांडुप (प.) मार्गे बोरिवली अशी एसटी बससेवा सुरू होणार आहे. या बसचे आरक्षण ः https://msrtc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सुरू होणार आहे. शनिवारी सायं. 4.45 वा. कणकवली येथून सुटणार असून, तळगाव येथे 6 वा. येईल. वरील बससेवेचा राजापूर विभागातील मुंबई उपनगरातील भांडुप, विक्रोळी, पवई, जोगेश्‍वरी, मालाड, बोरिवलीमधील सर्व नागरिकांनी ऑनलाईन तिकीट बुकिंग करून सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे सरचिटणीस संतोष राणे यांनी केले आहे.
---

राजापूर अर्बनच्या शृंगारतळीतील
शाखेचे रविवारी उदघाटन

राजापूर ः राजापूर अर्बन बँकेतर्फे गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे बारावी शाखा सुरू करण्यात येत असून त्याचा आरंभ रविवारी (ता. 21) सकाळी 11 वा. होणार आहे. बँकेचे अध्यक्ष हनिफ काझी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमाला चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, पाटपन्हाळेचे सरपंच विजय तेलगडे, शृंगारतळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मोहन संसारे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन बँकेचे उपाध्यक्ष प्रसाद मोहरकर, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष अनिलकुमार करंगुटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे, शाखाधिकारी आरिफ कर्णेकर यांच्यासह सर्व संचालक मंडळाने केले आहे.
--

जिल्हा नियोजन समितीवर अशफाक हाजू यांची निवड

राजापूर ः शिवसेना तालुकाप्रमुख आणि राजापूर तालुका ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष अशफाक हाजू यांची रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या शिफारसीनुसार शासनाने ही नियुक्ती केली आहे. जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेल्या व सामान्यपणे जिल्हा नियोजन समितीच्या क्षेत्रातील निवासी असलेल्या 9 व्यक्तींची जिल्हा नियोजन समितीमध्ये विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये हाजू यांचाही समावेश आहे.
..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com