शोषितांच्या उन्नतीसाठी कार्य सुरू ठेवा

शोषितांच्या उन्नतीसाठी कार्य सुरू ठेवा

03010
कणकवली : सिंपन प्रतिष्‍ठानतर्फे प्रि. आर. एल. तांबे आणि नाट्यदिग्‍दर्शक राहुल भंडारे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शेजारी मनीषाताई आंबेडकर, तहसीलदार रमेश पवार, अनिल तांबे, डॉ. संदीप कदम आदी. (छायाचित्र : प्रथमेश जाधव)


शोषितांच्या उन्नतीसाठी कार्य सुरू ठेवा

मनीषाताई आंबेडकर; ‘सिंपन’तर्फे भंडारे, आर. एल. तांबेंना पुरस्कार

कणकवली, ता.१५ : शोषित आणि तळागाळातील घटकांसाठी सिंपन प्रतिष्‍ठान कार्य करत आहे. याचा आम्‍हाला सार्थ अभिमान आहे. प्रतिष्‍ठानने हे काम अवितरणपणे सुरू ठेवावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या मनीषा ताई आंबेडकर यांनी केले.
येथील प्रहार भवनमध्ये सिंपन प्रतिष्‍ठानतर्फे परिवर्तन दिन अभिवादन व पुरस्कार प्रदान सोहळा कार्यक्रम झाला. यात मनीषाताई आंबेडकर यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. यावेळी ‘सिंपन’चे अध्यक्ष अनिल तांबे, सरचिटणीस बाळकृष्ण जाधव, तहसीलदार रमेश पवार, सत्यविजय तांबे, अशोक कांबळे, प्रमोद नाईक, लक्ष्मण चौकेकर, श्रीकांत धारपवार, धनाजी जाधव, गोपाळ जाधव, चित्तरंजन जाधव, वैशाली जाधव, प्रकाश करूळकर, मिलिंद चिंचवलकर, तानाजी कांबळे आदी उपस्थित होते.
‘सिंपन’चे तांबे म्हणाले, ‘‘आंबेडकर चळवळ पुढे नेण्याचे काम प्रतिष्ठान करीत आहे. या संघटनेच्या माध्यमातून तरुण पिढीला या चळवळीशी जोडून घेत आहोत.’’ कार्यक्रमात प्रा. रमाकांत यादव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ जीवन गौरव पुरस्कार शिक्षण महर्षी प्रि. आर. एल. तांबे तर प्रा. विजय जासंडेकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ विजय भव युवा पुरस्कार नाट्यनिर्माता राहुल भंडारे यांना देण्यात आला. प्रि. आर. एल. तांबे यांनी प्रतिष्ठानच्या प्रत्येक उपक्रमाला सहकार्य करणार असल्याचे सांगितले. तर श्री.भंडारे यांनी या पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल प्रतिष्ठानचे आभार मानले. यावेळी तहसीलदार आर. जे. पवार, चित्रकार नामनंद मोडक, संदीप कदम, अशोक कृष्णा, जयप्रकाश जाधव, विद्या त्रिबंककर यांचा सन्मान झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी चित्रफितीच्या माध्यमातून सिंपन प्रतिष्ठानच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते मनोज संसारे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राजेश कदम यांनी सूत्रसंचालन केले. लक्ष्मण चौकेकर यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com