आठवडा बाजार नव्या जागेत

आठवडा बाजार नव्या जागेत

03092
सावंतवाडी ः येथील आठवडा बाजाराच्या नव्या जागेबाबत चाचपणी करताना पालिकेच्या परवीन शेख आदी. (छायाचित्र ः रुपेश हिराप)


आठवडा बाजार नव्या जागेत

सावंतवाडी पालिकेचे नियोजन; आजपासून अंमल, वाद टाळण्यासाठी पोलिस बंदोबस्त

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १५ ः येथील शहराचा आठवडा बाजार अखेर उद्यापासून (ता.१६) गोडाऊन परिसरातील नव्या जागेत पोलिस बंदोबस्तात भरवला जाणार आहे. कुठल्याही प्रकारे स्थानिक आणि बाहेरचा असा वाद होऊ नये, यासाठी प्रयत्न राहणार असून बापूसाहेब महाराज पुतळा ते शिवरामराजे पुतळा परिसरात जे व्यापारी आठवडा बाजारासाठी बसत त्यांनाच नव्या जागेमध्ये प्रथम प्राधान्य देणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनातर्फे कर्मचारी परवीन शेख यांनी दिली.
नव्या जागेमध्ये १४५ व्यापाऱ्यांसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. शिवाय लाइट्स व इतर सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोणीही वादविवाद घडून आणण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहनही शेख यांनी केले आहे. येथील मोती तलावावरील आठवडा बाजार मागच्या मंगळवारपासून (ता.९) शासकीय गोडाऊन परिसरातील नव्या जागेत लावण्याबाबत हालचाली सुरू झाल्या होत्या. मागच्या मंगळवारी हॉकर्स संघटनेतर्फे सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याने नव्या जागेत बसण्यासाठी मनाई करत पालिका प्रशासनाकडे त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. पालिका प्रशासनाने ही मागणी मान्य करत आवश्यक सुविधा नव्या जागेमध्ये उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे उद्यापासून हा बाजार नव्या जागेत स्थलांतरित होणार आहे. सकाळी पोलिस बंदोबस्तात बाजार सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये शहरातील बापूसाहेब पुतळा ते शिवराम राजे पुतळा परिसरात जे व्यापारी आपला व्यवसाय करत होते, त्यांनाच नव्या जागेमध्ये प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. सद्यस्थितीत या ठिकाणी १४५ व्यापाऱ्यांसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. गोडाऊन परिसर ते मिलाग्रीस हायस्कूलपर्यंत हा बाजार बसविण्यात येणार आहे. त्यामुळे कोणीही या ठिकाणी स्थानिक आणि बाहेरचा असा वाद निर्माण करू नये, असे आवाहन केले आहे.
----------
कोट
व्यापाऱ्यांसाठी नव्या जागेमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पाण्याची तसेच बाथरूमची सुविधा गार्डन तसेच सुविधा केंद्रामध्ये उपलब्ध आहे. शिवाय मोठ्या लाईट्स परिसरामध्ये बसवल्या आहेत. आवश्यक जागेचे मार्किंग केले आहे. त्यामुळे जागेवरून कोणाचाही वाद उद्भवू नये म्हणून पोलिसांचेही सहकार्य घेण्यात येणार आहे.
- परवीन शेख, प्रशासकीय कर्मचारी, सावंतवाडी पालिका
----------
कोट
नव्या जागेमध्ये आमच्या दीडशे व्यापाऱ्यांसाठी पालिकेने जागा उपलब्ध करून द्यायची आहे. त्यानंतर जर जागा शिल्लक राहिल्यास ती अन्य कुठल्याही व्यापाऱ्याला दिल्यास आमची कुठलीही हरकत नसणार.
- अॅड. संदीप निंबाळकर, जिल्हाध्यक्ष, हॉकर्स संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com