दुचाकी चोरी प्रकरणी संशयिताला जामीन

दुचाकी चोरी प्रकरणी संशयिताला जामीन

२२ ( पान ३)

दुचाकी चोरी प्रकरणी संशयिताला जामीन

चिपळूण : शहरातील दुचाकी चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करून चिपळूण पोलिसांनी काही तासात अटक केलेल्या संशयित अजय कदम याला चिपळूण न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर करत त्याची सुटका केली आहे.
चिपळूण शहरातील खेंड येथील समीर रामकृष्ण चिखले यांची दुचाकी रविवारी दुपारी चोरीस गेली होती. या बाबत त्यांनी तात्काळ चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.दरम्यान चिपळूणचे पोलीस सायंकाळी शहरातील पाग परिसरात गस्त घालत असताना त्यांना एक दुचाकीस्वार पोलिसांना बघून तो काहीसा गोधंळल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला विचारणा केली. चोरीस गेलेल्या दुचाकीच्या नंबरची खात्री करता ही तीच दुचाकी असल्याचे निष्पन्न झाले.त्यामुळे पोलिसांनी तात्काळ संशयित अजय कदम याच्यावर कारवाई केली.सोमवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले तेव्हा त्याला न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले. न्यायालयाने १५ हजाराच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर करत कदम याची मुक्तता केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com