-ठाकरेंना सोडून गेलेल्यांचा हिशोब जनता करणार

-ठाकरेंना सोडून गेलेल्यांचा हिशोब जनता करणार

२३ (पान २ साठी, सेकंड मेन)

त्यांचा हिशेब जनता करेल

अनंत गीते ; दापोलीतून शिवसेनेचे उमेदवार संजय कदम

दाभोळ, ता. १६ ः महाराष्ट्र हे विचाराने समृद्ध असणारे राज्य आहे. सत्तेच्या आणि खोक्यांच्या लालसेपोटी उद्धव ठाकरेयांना सोडून गेलेली ही सगळी प्यादी आहेत आणि त्यांचा हिशेब येत्या निवडणुकीत जनता करेल, असे प्रतिपादन माजी केंद्री मंत्री अनंत गीते यांनी केले.
दापोली विधानसभा मतदार संघात विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाने सुरवात केली असून त्याचा आरंभ कोंढे येथे मेळावा घेऊन करण्यात आला. या वेळी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी माजी आमदार संजय कदम हेच शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुढील उमेदवार असतील, असे जाहीर केले.
कोंढे येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख नियुक्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री. गीते म्हणाले, भाजप आणि शिवसेनेतून गेलेल्यांना माहिती आहे की, निवडणुका लागल्या की आपला सुपडा साफ होईल म्हणून ते घाबरून निवडणुका घेत नाहीत. फक्त ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत, कारण त्या निवडणुकीत पक्षाचं चिन्ह वापरलं जात नाही. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत तेथील जनतेने भाजपला नामशेष करत एकहाती सत्ता काँग्रेसच्या हाती दिली. ते आपल्याला महाराष्ट्रात घडवायचं आहे आणि जे शिवसेनेतून गेले आहेत त्यांची अवस्था ना घरका ना घाटका अशी करायची आहे. आज इथे नारळ फोडून त्याची सुरवात करू. मी उद्धव ठाकरे यांना शब्द दिला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतील पक्षाला सोडून गेलेल्या सर्व गद्दारांना मातीत गाडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.
या वेळी माजी आमदार संजय कदम, तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर, नगराध्यक्ष ममता मोरे, मानसी विचारे, तालुका सचिव नरेंद्र करमरकर, माजी उपसभापती शालिनी गोरिवले, माजी समाजकल्याण सभापती दिलीप कासारे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
------
तोंड दाखवायला जागा राहणार नाही

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत रामदास कदम यांनी मला पाडण्याचा विडा उचलला होता. त्या वेळी रमेश कदम नावाचा राष्ट्रवादीचा उमेदवार शेकाप पक्षाला दिला होता. हे सगळं कारस्थान दुबई येथे शिजले होते. असे असूनही मी निवडून आलो. त्या वेळी रामदास कदम हे उद्धव ठाकरे यांच्याकडे मला विधानपरिषद द्या, असे म्हणत गेले होते. त्यांना माझ्यामुळे विधानपरिषद मिळाली होती. हे आपण केलेले उपकार आहेत. अशी शेकडो उदाहरणे मी देईन. या वेळी रामदास कदम यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही असे गीते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com