महिला मंडळ इमारतीचे कुडाळमध्ये 
खासदार राऊत यांच्या हस्ते भूमिपूजन

महिला मंडळ इमारतीचे कुडाळमध्ये खासदार राऊत यांच्या हस्ते भूमिपूजन

03371
कुडाळ : महिला मंडळ इमारत कामाचे भूमिपूजन करताना खासदार विनायक राऊत. (छायाचित्र ः अजय सावंत)

महिला मंडळ इमारतीचे कुडाळमध्ये
खासदार राऊत यांच्या हस्ते भूमिपूजन
कुडाळ ः तब्बल ६५ वर्षे पूर्ण झालेल्या वास्तूला निधी देणे हे माझ्या दृष्टीने भूषणावह आहे. मंड़ळाच्या मागणीनुसार १५ लाख रुपये या वास्तूसाठी दिले आहेत. यापुढे या मंडळाचा विस्तार वाढण्यासाठी निधीची आवश्यकता भासल्यास पूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही खासदार विनायक राऊत यांनी महिला मंडळ इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी दिली. शहरातील शिवाजीनगर दत्तमंदिर येथील महिला मंडळाच्या इमारत कामाचे भूमिपूजन खासदार राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला मंडळाच्या अध्यक्षा उषा आठल्ये, नगराध्यक्षा आफरीन करोल, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, मंडळाच्या उपाध्यक्ष सुषमा कुलकर्णी, सेक्रेटरी मेघा सुकी, महिला जिल्हाध्यक्षा जान्हवी सावंत, शिवसेनेचे अतुल बंगे, संघटक बबन बोभोटे, प्रतिभा पाटणकर, किरण आठलेकर, नगरसेविका गंवडे, सचिन काळप, राजू गवंडे आदी उपस्थित होते. सौ. आठल्ये यांनी मंडळाच्या इमारतीला भरीव निधी दिल्याबद्दल खासदार राऊत यांचे आभार मानले.
.................
03372
पाडलोस ः येथे रुग्णांची तपासणी करताना वैद्यकीय अधिकारी.

पाडलोसमध्ये ४७ जणांची नेत्रचिकित्सा
बांदा ः पाडलोस गाव व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून नुकत्याच झालेल्या रक्तदान शिबिरानंतर आज नेत्रतपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या ग्रुपची दूरदृष्टी ग्रामस्थांच्या हिताची असल्याचे प्रतिपादन यावेळी सरपंच सलोनी पेडणेकर यांनी केले. ग्रामपंचायत व डॉ. गद्रे आय केअर अँड लेसर सेंटर क्लिनिकच्या संयुक्त विद्यमाने नेत्रचिकित्सा व अल्प दरात चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. उद्‍घाटन प्रसंगी सरपंच पेडणेकर, उपसरपंच राजू शेटकर, डॉ. जॅक्सन डिसोझा, विकास चव्हाण, दीपक कदम, सचिन पाडलोसकर आदी उपस्थित होते. शिबिरामध्ये ४७ ग्रामस्थांनी नेत्रचिकित्सा करण्यात आली. सचिन पाडलोसकर यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी नवीन कार्यकारिणी सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले. मावळते अध्यक्ष विश्राम गावडे यांनी सूत्रसंचालन केले. संतोष आंबेकर यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com