धीरज जाखल कुटुंबीयांना आर्थिक हातभार

धीरज जाखल कुटुंबीयांना आर्थिक हातभार

२ (टुडे पान १)

Rat७p२२.jpg ः
२३M०३३४८
आंबडवे ः धीरज जाखल यांच्या वडिलांकडे रक्कमेचा धनादेश सुपूर्द करताना कुणबी क्रीडा असोसिएशनचे पदाधिकारी व ग्रामस्थ.

Rat१७p२३.jpg ः
२३M०३३४९
प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेल्या चिंचाली संघाला गौरवताना आयोजक.

धीरज जाखलच्या कुटुंबीयांना मदतीचा हात

मंडणगड कुणबी असोसिएशन; ८० हजार सुपूर्द; स्मृती चषकाचे आयोजन

मंडणगड, ता. १७ ः आंबडवे (ता. मंडणगड) गावचा खेळाडू धीरज जाखल याचा मैदानात क्रिकेट खेळताना मृत्यू झाला. हा प्रकार मुंबईतील ओव्हल मैदानावर घडला. ऐन तारुण्यात धीरजचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबीयांवर आभाळ कोसळले. मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनने सामाजिक भावनेने जाखल कुटुंबीयांना मदतीचा हात दिला. सर्वानी एकत्र येऊन गोळा केलेले ८० हजार २०० रुपये कुटुंबीयांकडे सुपूर्द केले.
ओव्हल मैदानात १९ मार्चला धीरज क्रिकेट खेळण्यासाठी आला होता. मैदानात खेळण्यासाठी उतरला तेव्हा त्याच्या छातीत दुखू लागले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले; पण उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली. एकुलता एक मुलगा अचानक निघून गेल्याने आई-वडील, संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली होती. मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सभासद क्रिकेट संघ यांनी आपल्या या खेळाडूला श्रद्धांजली म्हणून आर्थिक निधी उभारण्याचा संकल्प केला. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. सामाजिक कार्यकर्ते, क्रिकेटप्रेमी, मित्र, नातेवाईक यांनी सढळ हस्ते मदत केली. आंबडवे संघ, मुंबई मंडळ व ग्रामस्थांचे फार मोलाचे सहकार्य लाभले. त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ १२ व १३ मे रोजी आंबडवे येथे धीरज जाखल स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आली. यामधून जमा झालेल्या रकमेचा धनादेश त्याचे वडील दीपक जाखल व आजोबा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. कुणबी क्रीडा असोसिएशनचे ग्रामीण अध्यक्ष सचिन माळी, सेक्रेटरी विजय ऐनेकर, मुंबई सेक्रेटरी हेमंत दुसार, सल्लागार रघुनाथ पोस्टुरे, काशिनाथ भुवड तसेच श्रीगणेश क्रीडा मंडळ आंबडवेचे सर्व पदाधिकारी, सर्व खेळाडू, ग्रामस्थ उपस्थित होते.

चौकट

चिंचाली संघाने पटकावला चषक
श्री गणेश क्रिकेट संघ आंबडवे, आयोजित (कै.) धीरज जाखल स्मृती चषकाचा मानकरी चिंचाली संघ ठरला तर द्वितीय क्रमांक निगडी मोहल्ला, तृतीय क्रमांक तेलेवाडी, चतुर्थ क्रमांक उंबरशेत यांनी पटकावला. उत्कृष्ट फलंदाज अजय डेरे (चिंचाली), उत्कृष्ट गोलंदाज दिशांत माटवणकर (निगडी मोहल्ला), मालिकावीर नरेंद्र पातेरे (उंबरशेत) यांना गौरवण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com