वेंगुर्लेत वाहतूक कोंडीचा त्रास

वेंगुर्लेत वाहतूक कोंडीचा त्रास

03424
वेंगुर्ले : येथील झुलते पुलाच्या ठिकाणी होत असलेल्या वाहतूक कोंडी संदर्भात मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांना निवेदन देताना उमेश येरम. सोबत इतर पदाधिकारी.


वेंगुर्लेत वाहतूक कोंडीचा त्रास

शिवसेना; झुलत्या पुलाजवळ पोलिस नियुक्तीची मागणी


सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १७ ः शहरातील पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या झुलता पूल परिसरात वाहतूक कोंडी नियंत्रणासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने येथील पोलिस ठाणे व नगरपरिषद मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नाने मांडवी खाडी व अरबी समुद्राच्या संगमावर उभारण्यात आलेला झुलता पूल हा तालुक्याच्या पर्यटनात विशेष भर टाकणारा प्रकल्प आहे.मनमोहक असा हा पूल सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. विशेष म्हणजे अनेक छायाचित्रकार येथे छायाचित्रणासाठी व व्हिडीओ चित्रीकरणासाठी पहिली पसंती दर्शवितात. सध्या पर्यटन हंगाम सुरू असून या ठिकाणी दिवसभर मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत आहेत; मात्र सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडीची मोठी समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. याचा पर्यटकांसहित स्थानिक नागरिकानंही मोठा त्रास सहन करावा लागत आहे, अशी खंतही यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी शिवसेना शहर प्रमुख उमेश येरम, श्रद्धा बाविस्कर-परब, युवक शहर प्रमुख संतोष परब, प्रवक्ते सुशील चमणकर, शाखा प्रमुख प्रभाकर पडते, तुळस विभाग प्रमुख संजय परब, सुनील तुळसकर, महेश परब आदी उपस्थित होते.
---
वाहतुकीचे नियोजन करा
नगरपरिषदेने पोलिस विभागाच्या मदतीने या ठिकाणी वाहतुकीचे नियोजन करावे. पोलिस विभागाच्यावतीने येथे वाहतूक कोंडी होत असलेल्या वेळेत वाहतूक पोलिस गर्दीच्या नियोजनासाठी तैनात करावा. त्यामुळे या ठिकाणी होणारी गर्दी नियंत्रित होऊन पर्यटनाचा आनंद पर्यटकांना घेता येईल. त्याकरिता नगरपरिषद व पोलिसांनी नियोजन करावे, अशी मागणी शहर शिवसेनेच्यावतीने आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com