बीएस्सी नर्सिंगसाठी सीईटी अनिवार्य

बीएस्सी नर्सिंगसाठी सीईटी अनिवार्य

बीएस्सी नर्सिंगसाठी सीईटी अनिवार्य
उच्च न्यायालयः बॅ. नाथ पै संस्थेतर्फे संपर्काचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १८ः ज्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात बी.एस्सी नर्सिंग या चार वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावयाचा आहे, त्यांना एमएच-बी.एस्सी नर्सिंग सीईटी-२०२३ ही प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य आहे. मागील वर्षापर्यंत हे प्रवेश ''नीट''द्वारे होत होते; परंतु शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बी.एस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाचे प्रवेश हे बारावी विज्ञानच्या गुणांवर केले आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये बी.एस्सी नर्सिंग आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी एमएच-बी.एस्सी नर्सिंग सीईटी-२०२३ ही सामाईक प्रवेश परीक्षा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांच्यामार्फत घेण्यात येणार आहे. ही प्रवेश परीक्षा राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी व नोंदणी अर्ज १७ ते २६ मे या कालवधीत निश्चित करावयाची आहे.
२७ मेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी शुल्क भरणे आवश्यक आहे. ही परीक्षा १०० गुणांची असून ती बारावी विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमावर आधारीत आहे. त्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इंग्रजी व परिचर्या कौशल्य या विषयांवर प्रत्येकी २० गुणांवर आधारीत प्रश्न (योग्य पर्याय निवडा पद्धतीने) आहेत. परीक्षेचा कालावधी १ तास ३० मिनिटे असणार असून माध्यम इंग्रजी असणार आहे.
अधिक माहितीसाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांच्या www.mahacet.org या संकेतस्थळावर भेट द्यावी किंवा बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या मोफत मार्गदर्शन कक्षामध्ये संपर्क साधावा, असे आवाहन बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या मीना जोशी, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com