कृषी सिंचन योजनेतून मागेल त्याला शेततळे

कृषी सिंचन योजनेतून मागेल त्याला शेततळे

१७ (पान २ साठी)

कृषी सिंचन योजनेतून शेततळे

मागेल त्याचा विचार ; उत्पादन व उत्पन्नवाढीसाठी उपक्रम ः पाण्याची गरज भागणार

रत्नागिरी, ता. १८ ः पर्जन्यधारित शेतीसाठी पाणलोटावर आधारित जलसंधारणाच्या उपाययोजनांद्वारे पाण्याची उपलब्धता वाढवून शेतकऱ्‍यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ करण्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत आता मागेल त्याला शेततळे देण्यात येणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्‍यांना आपल्या शेतात शेततळे घेऊन पाण्याची गरज भागवता येणार आहे.
मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेत शेततळ्यांचा समावेश २०२२ मध्ये केला गेला. राज्यातील शेतकऱ्‍यांना संपन्न आणि लखपती करण्याचे राज्य शासनाने ठरवले आहे. त्यानुसार शेतमालाचे उत्पादन वाढवण्यासाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. त्यातील एक भाग म्हणून मागेल त्याला शेततळे मिळणार आहे. शेततळ्यांसाठी अनुदान वाटप करण्यात येत असलेल्या अडचणी आता दूर झाल्या आहेत. त्यामुळे मागील त्याला शेततळे ही संकल्पना वेगाने अंमलात आणली जात आहे. यासाठी अर्जदार शेतकऱ्‍यांकडे स्वत:च्या नावावर किमान ०.२० हे. क्षेत्र असणे आवश्यक असून, क्षेत्रधारणास कमाल मर्यादा नाही.
अर्जदार शेतकऱ्‍याची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक राहील. अर्जदार शेतकऱ्‍यांनी यापूर्वी मागेल त्याला शेततळे, सामूहिक शेततळे अथवा भातखाचरातील बोडी किंवा इतर कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे या घटकाकरिता शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. कृषी विभागाचे कृषी साहाय्यक किंवा कृषिसेवक यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी शेततळे घेणे बंधनकारक आहे. कार्यारंभ आदेश मिळाल्यापासून शेततळ्याचे काम ३ महिन्यात पूर्ण करावयाचे आहे. लाभार्थ्याने स्वतःच राष्ट्रीयकृत बँक किंवा इतर बँकेतील खाते क्रमांक कृषी विभागाला सादरा करावा. शेततळ्याच्या बांधावर व पाण्याच्या प्रवाहाच्या भागांमध्ये स्थानिक प्रजातीच्या वनस्पतींची लागवड करावी. शेततळ्याची निगा व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित शेतकऱ्यांची राहील. पावसाळ्यात तळ्यात गाळ वाहून येणार नाही अथवा साचणार नाही यासाठी व्यवस्था लाभार्थ्याने स्वतः करावी. लाभार्थ्यांना ७/१२ उतार्‍यावर शेततळ्याची नोंद घेणे बंधनकारक आहे.
----

असा भरा अर्ज
महा ई-सेवा केंद्र शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी अर्ज भरणे शक्य आहे. महाडीबीटीवर लॉगिन केल्यानंतर सिंचन साधने व सुविधा या अंतर्गत वैयक्तिक शेततळे ही बाब निवडावी. त्यानंतर इनलेट आणि आउटलेटसह किंवा इनलेट आणि आउटलेटशिवाय यापैकी एक उपघटक निवडावा. शेततळ्याचे आकारमान व इतर माहिती भरून अर्ज सादर करावा. अर्ज करण्याकरिता https://mahadbtmabit.gov.in या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com