न्हाच्या चटक्याने सिंधुदुर्ग हैराण

न्हाच्या चटक्याने सिंधुदुर्ग हैराण

उन्हाच्या चटक्याने सिंधुदुर्ग हैराण
---
पारा ४० अंशांजवळ; तापमान आणखी वाढण्याचा अंदाज
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १८ ः तीव्र उन्हाच्या चटक्यामुळे जिल्ह्यातील नागरिक हैराण आहेत. तापमानात मोठी वाढ असून, विविध भागांत पारा ३६ ते ३९ अंशांपुढे गेला. नागरिकांच्या अंगाची लाही-लाही होत आहे. तापमानवाढ आणखी काही दिवस राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
उत्तर बिहारपासून मध्य छत्तीसगढपर्यंत समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्यामुळे तापमानवाढीत सतत बदल होत आहेत. त्याचा जिल्ह्याच्या वातावरणावरही परिणाम जाणवत आहे. जिल्ह्याच्या वातावरणात सातत्याने बदल होत आहे. काही दिवसांपासून तापमानात सतत चढ-उतार आहे. यंदा फेब्रुवारीतही तापमानात वाढ झाली होती. दोन-तीन दिवसांपासून पुन्हा एकदा तापमानवाढीच्या संकटाला नागरिकांना सामोरे लागले.
आज सकाळपासून तापमानवाढीचा कहर जिल्हावासीयांनी अनुभवला. सकाळी नऊपासून उन्हाचा चटका बसायला सुरुवात झाली. प्रचंड उकाडा जाणवत होता. त्यानंतर दुपारी जिल्ह्याच्या विविध भागांत पारा ३६ ते ३९ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोचला. भर दुपारी तर उन्हाचे प्रचंड चटके बसत होते. आणखी काही दिवस तापमान वाढ राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्याचा फटका जनजीवनाला बसेल. सध्या बांधकामांसह विविध कामांवर परिणाम होईल. याशिवाय, खरीप हंगाम पूर्वतयारीवरही परिणाम होणार आहे.

जिल्ह्याच्या तापमानात सतत बदल होत असून, आज देवगड तालुक्यात ३५ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्या तुलनेतच जिल्ह्याच्या विविध भागांत सरासरी तापमान असण्याची शक्यता आहे.
- डॉ. दामोदर विजय, शास्त्रज्ञ, रामेश्वर फळसंशोधन उपकेंद्र, देवगड

पावसाळी वातावरणाचे संकेत
एकीकडे वैशाख वणव्याच्या झळा तीव्र होत असतानाच आता दुसरीकडे देवगड तालुक्याच्या किनारी भागात जोराचा वारा सुटला आहे. त्यामुळे किनारी भागात पावसाळी वातावरणाचे संकेत मिळत आहेत. वाऱ्‍यामुळे छोट्या मच्छीमारांना त्याचा त्रास जाणवत असल्याचे सांगितले जात होते. आज सकाळपासून वातावरणातील उष्णतेत वाढ झाल्याचे चित्र होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com