भटवाडीतील कामे पावसाळ्यापूर्वी मार्गी लावा

भटवाडीतील कामे पावसाळ्यापूर्वी मार्गी लावा

swt192.jpg
03728
सावंतवाडीः येथील पालिकेच्या कार्यालयीन अधीक्षक आसावरी शिरोडकर यांच्याकडे निवेदन सुपूर्त करताना दिपाली भालेकर

भटवाडीतील कामे पावसाळ्यापूर्वी मार्गी लावा
दिपाली भालेकरः सावंतवाडी पालिकेस निवेदन सादर
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ः भटवाडी परिसरातील रस्त्यांची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याबरोबरच गटारे स्वच्छता व रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी मारण्याची कामे पावसाळ्यापूर्वी मार्गी लावा, अशी मागणी माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे. काही रस्त्यांची कामे मंजूर असून टेंडर प्रक्रियेअभावी रखडली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात होणारे अपघात टाळण्यासाठी निदान रस्त्यातील खड्डे तरी बुजविण्यात यावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. याबाबत सौ. भालेकर यांनी पालिकेच्या कार्यालयीन अधीक्षक आसावरी शिरोडकर यांच्याकडे निवेदन सुपूर्द केले आहे.
त्यात नमूद केले आहे की, ‘शहरातील भटवाडी परिसरातील ढोरे पाणंद, दत्तमंदीर ते धोपेश्वरकर घरापर्यंतचा रस्ता आणि गुप्ता दुकानापासून दत्त मंदीरपर्यंतचा रस्ता या परिसरातील रस्त्याची कामे प्रलंबित आहेत. पावसाळ्यापूर्वी गटारे स्वच्छ करणे, रस्ते दुतर्फा वाढलेली झाडी मारणे आदी कामे होण्याची अत्यावश्यकता आहे. ढोरेपाणंद येथील रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. पादचाऱ्यांना चालतानाही त्यांचा त्रास होत आहे. हे खड्डे पावसाळ्यापूर्वी बुजविणे आवश्यक आहे. दत्तमंदीर ते धोपेश्वरकर घरापर्यंतचा रस्ता खराब झालेला असून अनेक ठिकाणी पडलेले खड्डे पावसाळ्यापूर्वी बुजविण्याची गरज आहे. राणेपाणंद येथील टेंडर मंजूर झालेले असून वर्क ऑर्डर होऊनही खडीकरण, डांबरीकरणाचे काम सुरु करण्यात आलेले नाही. तरी संबंधित ठेकेदारास पावसाळ्यापूर्वी काम करण्याच्या सुचना देण्यात याव्यात. वरील तिन्ही कामांची खडीकरण डांबरीकरणाची टेंडर प्रक्रिया चालू आहे. परंतु, टेंडर मंजूर झाल्यानंतर वर्कऑर्डर होईपर्यंत वेळ लागणार असल्याने पावसाळ्यापूर्वी ही कामे होण्याची शक्यता दिसत नाही. या कामांबाबत गेले एक वर्ष पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु, ती अद्याप करण्यात आलेली नाहीत. आता पावसाळा तोंडावर आलेला असून कामे पूर्ण न झाल्यास अपघात व हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तिन्ही रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम तात्काळ हाती घेण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com