शिवराज्याभिषेक समितीच्यावतीने तुळजा भवानीस चांदीचे छत्र अर्पण

शिवराज्याभिषेक समितीच्यावतीने तुळजा भवानीस चांदीचे छत्र अर्पण

swt१९४.jpg
०३७४३
प्रतापगडः श्री शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने समितीच्यावतीने प्रतापगड निवासिनी श्री तुळजा भवानी देवीला चांदीचे छत्र अर्पण करण्यात आले.

शिवराज्याभिषेक समितीच्यावतीने
तुळजा भवानीस चांदीचे छत्र अर्पण
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १९ः श्री शिवराज्याभिषेक दिनाच्या (३५० वा) निमित्ताने शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीच्यावतीने प्रतापगड निवासिनी श्री तुळजाभवानी देवीला रजतछत्र (चांदीचे छत्र) अर्पण करण्यात आले.
समितीच्या या संकल्पास राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावर्षीच्या वैशाख कृष्ण त्रयोदशीला साडेतीन किलो चांदीचे छत्र श्री भवानी देवीला समितीच्यावतीने अर्पण करण्यात आले. ३५० वर्षापूर्वी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा जसा साजरा झाला तसाच सोहळा यावर्षी श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगडमार्फत साजरा करण्यात येणार आहे. मंगळवारी (ता. १६) नवचंडी यज्ञ शिवरायांचे राजपुरोहित बाळभट्ट यांचे वंशज सुधीरदास महंत यांच्या हस्ते पार पडला. बुधवारी (ता. १७) सकाळी सर्वप्रथम भगव्या झेंड्याचे ध्वजारोहन करुन या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर रणवाद्यांच्या व ढोलताशांच्या गजरात देवीचे रजतछत्र पालखीत ठेऊन त्याची मिरवणूक काढण्यात आली. समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांच्या हस्ते मंदिरात छत्राची विधिवत पूजा करण्यात आली. नंतर ते श्री भवानी देवीस अर्पण करण्यात आले व त्याची स्थापना श्री भवानी देवीच्या मस्तकी करण्यात आली. समस्त प्रतापगडचे निवासी या सोहळ्यास उपस्थित होते. याप्रसंगी इतर पदाधिकारी, अप्पा उतेकर, मंदिर व्यवस्थापक पत्की, मंदिर पुजारी हडप, प्रतापगडाचे स्थानिक रहिवासी, शिवप्रेमी उपस्थित होते. साडे तीन किलो चांदीचे छत्र अर्पण करून शिवराज्याभिषेक समितीने पुन्हा एकदा ३५० वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com