ःअरुंद रस्ता, दरडीही धोकादायक

ःअरुंद रस्ता, दरडीही धोकादायक

२ (पान २ साठीमेन)


-rat१९p६.jpg ः
२३M०३७२०
राजापूर ः डांबरीकरण झालेला अणुस्कुरा घाटरस्ता.
-rat१९p७.jpg ः
२३M०३७२१
अणुस्कुरा घाटरस्ता.
-rat१९p८.jpg ः
२३M०३७२२
पावसाळ्यामध्ये दरडी कोसळून रस्ता बंद होतो.
-----

अरुंद रस्ता, दरडीही धोकादायक

अणुस्कुरा घाट ; डांबरीकरणानंतरही घाटमार्ग असुरक्षित

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १९ ः रत्नागिरी जिल्ह्याला पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्‍या राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटामध्ये गेल्या काही वर्षामध्ये सातत्याने पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी दरडी आणि मातीसह दगड पडण्याचे प्रकार घडत आहेत. घाटरस्त्यातील काही ठिकाणी विशेषतः वळणांच्या ठिकाणी रस्ता अरुंद असून अनेक ठिकाणच्या दरडी धोकादायक स्थितीत आहेत. त्यामुळे रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले असले तरी पश्‍चिम महाराष्ट्रातील दळवळणाच्यादृष्टीने सुरक्षित असणारा अणुस्कुरा घाटमार्ग असुरक्षित होऊ लागला आहे. त्यामुळे हा घाटरस्ता कायमस्वरूपी निर्धोक होण्याच्यादृष्टीने उपाययोजनांची आवश्यकता आहे.
अणुस्कुरा घाटातील रस्त्यामुळे राजापूर तालुका घाटमाथ्यावरील भागाशी जोडला गेला आहे. या मार्गाने कमी कालावधीमध्ये घाटमाथ्यावरील भागामध्ये जा-ये करणे सहज शक्य होत असल्याने या रस्ता ‘शॉर्टकट मार्ग’ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे वाहनचालकांकडून या मार्गाला प्राधान्य दिले जात असून या रस्त्यावरील वाहनांची वर्दळ वाढली आहे. घाटातील उंच डोंगरभागाचे कटिंग करून नागमोड्या वळणांचा हा निमर्नुष्य रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी उंचच्या डोंगर, उभ्या रषेतील दरडी, मोठमोठ्या दगडी ठिकठिकाणी कधीही खाली कोसळण्याच्या स्थितीत आहेत.
गेल्या काही वर्षामध्ये अतिवृष्टीच्या काळामध्ये धोकादायक दरडी, मोठमोठे दगड आणि माती पडून रस्ता काही काळापुरता बंद झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याची पुनरावृत्ती गेल्या दोन वर्षामध्ये सातत्याने घडली आहे. या धोकादायक स्थितीमध्ये यावर्षीही फारसा फरक झालेला दिसत नाही. सद्यःस्थितीत सुमारे तीन किमीच्या परिसरातील दरडी धोकादायक स्थितीत आहेत. नागमोड्या वळणाच्या येथे संरक्षण कठड्यांना वाहनांचा मागचा भाग लागून काही ठिकाणी कठडे तुटले आहे. त्यामुळे दरडीसह माती अन् दगड कोसळण्याची शक्यता आहे. पावसाळ्यातील संभाव्य धोक्यांच्या अनुषंगाने बांधकाम विभागाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या असल्या तरी येणाऱ्‍या पावसाळ्यामध्ये त्याची सक्षमता स्पष्ट होणार आहे.
---
कोट ः
अणुस्कुरा घाटातील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले असून, रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत झाला आहे. पावसाळ्यामध्ये कोसळलेल्या मात्र, वाहतुकीसाठी अडथळा ठरणाऱ्या ठिकठिकाणच्या दरडींची माती काढण्यात आली आहे. पावसाळ्यामध्ये घाटरस्त्यामध्ये आपत्ती ओढावल्यास आवश्यक ती यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
--स्वप्नील बावधनकर, कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com