ध्वजस्तंभ नूतनीकरण 
दोडामार्गमध्ये रोखले

ध्वजस्तंभ नूतनीकरण दोडामार्गमध्ये रोखले

ध्वजस्तंभ नूतनीकरण
दोडामार्गमध्ये रोखले

मुख्याधिकाऱ्यांची तक्रार; शासकीय कामात अडथळा

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १९ : शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कसई-दोडामार्ग मुख्याधिकाऱ्यांनी पोलिसांकडे केली आहे. येथील गांधी चौकातील ध्वजस्तंभाच्या नूतनीकरणाचे काम नगरपंचायतीतर्फे सकाळी सुरू केले होते. ती जागा आपली असल्याचे सांगत एका नागरिकाने काम रोखून काम करू देणार नसल्याचे सांगितल्याने कारवाई करण्याची मागणी करण्यात आल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले.
दोडामार्ग गांधी चौकात असलेला ध्वजस्तंभ हा पूर्वीचा आहे. त्याच्या नूतनीकरणाचे काम नागरपंचायतीने हाती घेतले आहे. आज ध्वजस्तंभाच्या नूतनीकणाच्या कामाला सुरुवात केली होती; मात्र, काम करीत असलेल्या कामगारांना पिटाळून लावले. ही जागा माझी आहे. नगरपंचयातची नाही, असे सांगून एका नागरिकाने काम बंद पडले. यावेळी नगराध्यक्ष चेतना चव्हाण, प्रशासकीय अधिकारी प्रकाश पाटील नगरपंचायत कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित राहिले. नगराध्यक्ष चव्हाण यांनी त्यांना कामात अडथळा आणू नको हे काम प्रशासकीय आहे. तुमची जागा असलेल्या त्या जागेची कागदपत्रे सादर करा. ही जागा नगरपंचायतीच्या ताब्यात असून सातबारामध्ये तशी नोंदही आहे, असे सांगितले. तरीही त्यांनी चव्हाण व प्रशासनाचे ऐकून न घेता काम चालू करण्यास सक्त विरोध केला. काम चालू करू देणार नसल्याचा त्यांनी पवित्रा घेतल्यावर नगराध्यक्ष चव्हाण व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला. यावेळी मुख्याधिकारी उपस्थित नव्हते. दुपारनंतर मुख्याधिकारी हजर राहिल्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची लेखी मागणी पोलिसांकडे केली. तसे, लेखी पत्रव्यवहारही मुख्याधिकाऱ्यांनी पोलिसांना केला आहे.
-----------------
कोट
विकासकामात अडथळा नको ः चव्हाण
कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरातील तसेच नगरातील विकासकामे झपाट्याने चालू आहेत. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हा एक प्रयत्न आहे. अशी विकासकामे करताना जर कोणी अडवणूक केली तर खपवून घेतले जाणार नाही. मग कोणीही असला तरीही त्याच्या विरुद्ध कारवाई केली जाईल. त्यामुळे विकासकामे करताना अडवणूक करू नये, अशी विनंती नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com