कदम यांच्याकडून वाढदिनी
बांदा केंद्रशाळेला साहित्य

कदम यांच्याकडून वाढदिनी बांदा केंद्रशाळेला साहित्य

03922
बांदा ः केंद्रशाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर.

कदम यांच्याकडून वाढदिनी
बांदा केंद्रशाळेला साहित्य
बांदा, ता. २० ः वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत शहरातील युवा सामाजिक कार्यकर्ता नीलेश कदम यांनी आज शहरातील १० गरजू व होतकरू मुलांचे पालकत्व स्वीकारत एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला. या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. हा कार्यक्रम येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा नंबर १ येथे झाला.
बांदा उपसरपंच जावेद खतीब यांनी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. नीलेश कदम यांनी आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने काम केल्यास निश्चितच समाजशील समाज उभा राहू शकतो, असे मत व्यक्त केले. यावेळी बांदा पोलिस निरीक्षक शामराव काळे, तलाठी वर्षा नाडकर्णी, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, श्रेया केसरकर, माजी सरपंच बाळा आकेरकर यांनी मनोगत व्यक्त केले. नेमळे माजी सरपंच विनोद राऊळ, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर, रत्नाकर आगलावे, आबा धारगळकर, माजी सदस्य मकरंद तोरसकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नीलेश मोरजकर, सिद्धेश महाजन, डेगवेचे माजी सरपंच प्रवीण देसाई, बाबा काणेकर, शैलेश केसरकर, संदीप बांदेकर, नीलेश देसाई, साई धारगळकर, साहिल कल्याणकर, ऋषी हरमलकर, सुनील धामापूरकर, सिद्धेश नाईक, सागर सावंत, पनो येडवे आदींसह विद्यार्थी, पालक उपस्थित होते. यावेळी कदम यांचा वाढदिवस साजरा करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या १० मुलांसह कदम यांनी उमेद फाउंडेशनच्या विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत अजून २ विद्यार्थी दत्तक घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक जे. डी. पाटील यांनी केले. यावेळी बांदा केंद्रशाळेतून बदली झालेल्या शिक्षिका वंदना शितोळे व नव्याने रुजू झालेले शिक्षक शांताराम असनकर यांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com