मिठमुंबरीत आज ‘किनारा स्वच्छता’

मिठमुंबरीत आज ‘किनारा स्वच्छता’

04009
मिठमुंबरी ः येथील ग्रामपंचायतीमध्ये विनायक ठाकूर यांच्या उपस्थितीत स्वच्छता कार्यक्रम नियोजन बैठक झाली.

मिठमुंबरीत आज ‘किनारा स्वच्छता’

स्थानिकांचे विविध कार्यक्रम; ग्रामपंचायत बैठकीत नियोजन

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २० ः जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या (ता. २१) सायंकाळी चारला मिठमुंबरी (ता.देवगड) येथे समुद्र किनारा स्वच्छता कार्यक्रम व स्थानिक कलाकारांच्या माध्यमातून समुद्र किनारी प्रचार, प्रसिद्धी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याच्या नियोजनाची बैठक आज मिठमुंबरी येथे झाली.
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, जिल्हा पाणी व स्वच्छता कक्ष, येथील पंचायत समिती व ग्रामपंचायत मिठमुंबरी यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक उपमुख्यकार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता विभाग) विनायक ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मिठमुंबरी ग्रामपंचायतीत झाली. यावेळी या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली. यामध्ये उद्या सायंकाळी ४ ते ४.३० ढोलवादन व मान्यवरांचे स्वागत, ४.३० ते ६ समुद्र किनारा स्वच्छता कार्यक्रम, सायंकाळी ६.१५ ते ६.३० वाळूशिल्प पाहणी, ६.३० ते ७ दांडी नृत्य, ७ ते ७.३० स्वच्छता पोवाडा, ७.३० ते रात्री ८ लमाणी नृत्य, ८ ते ८.३० स्थानिक फुगडी नृत्य व समारोप असा कार्यक्रम मिठमुंबरी येथे होणार आहे. या बैठकीवेळी सहाय्यक गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) नीलेश जगताप, मिठमुंबरी सरपंच बाळकृष्ण गावकर, उपसरपंच गुरुनाथ गावकर, प्रवीण कानकेकर, ग्रामसेविका रेश्मा गोवळकर, ग्रामपंचायत सदस्य संदीप मुंबरकर, अनिल गावकर, सत्यवान गावकर, हेमंत तोडणकर, विनिता मुंबरकर आदी उपस्थित होते. तालुक्यातील पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा किनारा म्हणून मिठमुंबरीकडे पाहिले जाते. हा किनारा पर्यटनदृष्ट्या अधिक विकसित व्हावा, यासाठी असे कार्यक्रम महत्त्वाचे आहेत. कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन गटविकास अधिकारी करिश्मा नायर यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com