बुधवारपासून रेटिनातज्ज्ञ उपलब्ध

बुधवारपासून रेटिनातज्ज्ञ उपलब्ध

३२ (पान २ किंवा ५ साठी)


खेडच्या इन्फिगो हॉस्पीटलतर्फे
उद्यापासून रेटिनातज्ज्ञ उपलब्ध

रत्नागिरी, ता. २२ : खेड शहरातील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे प्रख्यात रेटीनातज्ज्ञ डॉ. प्रसाद कामत हे बुधवार (ता. २४) व गुरुवारी (ता. २५) मधुमेही रुग्णांच्या डोळ्यांच्या पडद्याची तपासणी व शस्त्रक्रिया करणार आहेत. मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.
खेडमध्ये इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमुळे नेत्ररुग्णांना फायदा होत आहे. इन्फिगो आय केअरचे रेटिनातज्ज्ञ डॉ. प्रसाद कामत हे दर महिन्यातून एकदा खेडमध्ये रेटिनारुग्णांची (डोळ्याचा पडदा) तपासणी करून उपचार करत आहेत. खेड एसटी डेपोजवळ, गोळीबार मैदान, डॉ. धारिया हॉस्पिटल बिल्डींमध्ये इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सुरू झाल्यापासून अनेक रुग्ण लाभ घेत आहेत.
रक्तातील अनियंत्रित साखर डोळ्यांवर परिणाम करते. त्याचा परिणाम म्हणजे दृष्टी पटल किंवा रेटीनाला सूज येते, पडद्यावरती रक्तस्त्राव होतो, पडद्याला छिद्र पडते अशा समस्या येऊ शकतात. पण मधुमेही रुग्णांनी वर्षातून किमान दोनदा रेटीनातज्ज्ञांकडून तपासणी करून घेतल्यास पुढील धोका टाळता येईल. रेटिना तपासणी करण्याची व त्यावरील अवघड शस्त्रक्रियासुद्धा येथे केल्या जाणार आहेत. अद्ययावत तंत्रज्ञानामुळे अवघड रेटिना तपासणी केली जाणार आहे.
रेटिनातज्ज्ञ डॉ. कामत हे चेन्नईच्या शंकर नेत्रालयातील उच्च प्रशिक्षित रेटीनातज्ज्ञ आहेत. त्यांनी देशातील विविध शहरांतील हजारो रुग्णांवर रेटीनाचे उपचार केले आहेत. अधिक माहिती व पूर्वनोंदणीसाठी रुग्णालयाशी संपर्क साधावा असे आवाहन इन्फिगोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी केले आहे.
-----------
अद्ययावत सुविधा
इन्फिगो आय केअर हॉस्पीटलमध्ये ग्रीन लेझर, डायमेन्शनल ऑप्टिकल टोपोग्राफी, फिल्ड ॲनालायझर, अर्टली मशीन अशी अत्याधुनिक निदान यंत्रणा आहे. याद्वारे रेटीनाच्या समस्यांची अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने तपासणी केली जाते. अत्याधुनिक अशा सूक्ष्म पद्धतीने केली जाणारी बिनटाक्याची व भूल न देता होणारी मोतीबिंदू शस्त्रक्रिया, पडद्याच्या (रेटिना) सर्व शस्त्रक्रिया होणारे उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील हे एकमेव रुग्णालय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com