36 वर्षांपूर्वीच्या आठवणीनी त्यांचे डोळे पाणावले

36 वर्षांपूर्वीच्या आठवणीनी त्यांचे डोळे पाणावले

१३ (टुडे पान ३ साठी)


-rat२३p६.jpg-
२३M०४४३६
गुहागर : ३६ वर्षांनी एकत्रित आलेले शालेय विद्यार्थी.
----

३६ वर्षांपूर्वीच्या आठवणींनी उजाळा

गुहागर हायस्कूल ; माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

गुहागर, ता. २३ : येथील श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरच्या सन १९८६-८७ दहावीच्या बॅचचे पहिले स्नेहसंमेलन गुहागर बाजारपेठेतील खातू मसाले उद्योजक शाळिग्राम खातू यांच्या घराच्यावरील हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडले. या स्नेहसंमलनासाठी विविध ठिकाणाहून २२ माजी विद्यार्थी उपस्थित होते.
सन १९८६-८७ दहावीच्या बॅचचे पहिलेच स्नेहसंमेलन असल्याने सगळ्यांनी शाळेच्या आठवणींमध्ये, गमतीजमतीमध्ये दिवस घालवला. पहिलंच गेट टु गेदर असल्यामुळे सर्वांचे भारतीय संस्कृतीप्रमाणे औक्षण करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रत्येकाने आपण सध्या कुठे राहतो, कोणती नोकरी व्यवसाय करतो, कुटुंबाची माहिती असा परिचय करून दिला. त्यानंतर सर्वांनी ३६ वर्षांपूर्वीच्या शाळेतील आठवणी, गमतीजमती, शिक्षकांसोबतचे प्रसंग सांगून भुतकाळ जीवंत केला. या अनौपचारीक कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अन्नपूर्णा हॉटेलचे मालक श्यामकांत खातू यांनी केले.
सायंकाळी शाळेला भेट दिली. त्यावेळी मुख्याध्यापक सुधाकर कांबळे यांच्याकडे दोन सिलींग फॅन शाळेसाठी दिले. शाळाभेटीवेळी या विद्यार्थ्यांनी त्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांनाही बोलावले होते. यामध्ये सौ. पाटणकर, अशोक आठवले, अशोक दीक्षित, श्री. खवरे यांचा समावेश होता. सर्व माजी विद्यार्थ्यांनी नतमस्तक होवून आपल्या शिक्षकांना मानवंदना दिली. त्यानंतर शाळेत पुन्हा एकदा गप्पा गोष्टीचा कार्यक्रम रंगला. आपली शाळा आणि शिक्षक यांच्याविषयी बोलताना आणि संमेलनाचा समारोप करताना पन्नाशी पार केलेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले होते. स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी गुहागरमधील सिद्धी सोहनी, स्नेहा वरंडे, बापू लोखंडे, शामकांत खातू, हेमचंद्र मोरे, वासुदेव खरे, अतुल फडके, उमेश ओक आदींनी मेहनत घेतली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com