वृक्षारोपणासाठी रोपे उपलब्ध करा

वृक्षारोपणासाठी रोपे उपलब्ध करा

04445
सावंतवाडी ः उपवनसंरक्षक एस. नवलकिशोर रेड्डी यांना माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी निवेदन दिले. शेजारी सुनील राऊळ, दीपक राऊळ, डॉ विलास सावंत, अनघा रामाणे आदी.

वृक्षारोपणासाठी रोपे उपलब्ध करा

ब्रिगेडियर सुधीर सावंत; सावंतवा़डी उपवनसंरक्षकांना निवेदन

सावंतवाडी, ता. २२ ः प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या सुमारे २५ हजार वृक्षांचे रोपण करायचे आहे. ती रोपे उपलब्ध करून द्यावीत, तसेच आंबोली येथील सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या जागेवर वृक्षारोपण करण्याचे नियोजन असून तेथे कोणती वृक्ष लागवड करावी, याबाबत मार्गदर्शन करावे, अशी मागणी माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी उपवनसंरक्षक एस. नवलकिशोर रेड्डी यांच्याशी चर्चेदरम्यान व्यक्त केली. याबाबतचे निवेदन त्यांनी रेड्डी यांना दिले.
यावेळी किर्लोस कृषी केंद्र शास्त्रज्ञ डॉ. विलास सावंत, कार्यकारी अधिकारी अनघा रामाणे, सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या संस्थेचे सचिव सुनील राऊळ, ऑफिस इन्चार्ज दीपक राऊळ, प्रा. विवेक राणे, प्रा. मनवेल फर्नांडिस, दीपक सावंत आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान, कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती शिवाजी महाराज कृषी महाविद्यालय, सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, डॉन बास्को आदी संस्थांतर्फे वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती या संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सावंत यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा दिन राज्यभर ‘शिवराज्याभिषेक वर्ष’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रम हाती घेतले जाणार आहेत. महाराष्ट्रामध्ये २५ हजार वृक्षारोपणाचे उद्दिष्ट या निमित्ताने ठेवले आहे. निसर्गाचे संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. वृक्ष मानवाला उपयुक्त असणारा प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन निर्मिती करतात. त्यामुळे विद्यार्थी, महाविद्यालय, शाळा, कृषी विभाग, सामाजिक वनीकरण, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत व सैनिक फेडरेशन अशा विविध संस्थांच्या सहकार्यातून उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या जागेवर वृक्षारोपण करण्याचे नियोजन आहे; मात्र आंबोलीतील थंड हवेच्या वातावरणात कोणत्या प्रकारच्या रोपांची लागवड करावी, याबाबत योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.’’ यावेळी ब्रिगेडियर सावंत यांनी उपवनसंरक्षक रेड्डी यांच्याकडे वृक्षारोपणासाठी रोपे उपलब्ध करून देण्याची मागणी केली. शासकीय नियमानुसार झाडे उपलब्ध करून दिली जातील. तसेच वृक्षारोपणाबाबत मार्गदर्शन केले जाईल, अशी ग्वाही यावेळी रेड्डी यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com