तळेरेत विकासकामांचे काँग्रेसकडून भूमिपूजन

तळेरेत विकासकामांचे काँग्रेसकडून भूमिपूजन

04450
तळेरे ः येथे विकासकामांचे भूमिपूजन काँग्रेस जिल्हाध्यक्ष ईशाद शेख यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

तळेरेत विकासकामांचे काँग्रेसकडून भूमिपूजन

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २३ ः खासदार कुमार केतकर यांच्या स्थानिक विकास निधीतून काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख व जिल्हा सरचिटणीस प्रवीण वरूनकर यांच्या विशेष प्रयत्नाने तळेरे (ता. कणकवली) येथे मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन काँग्रेस जिल्हाध्यक्ष ईशाद शेख यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी तरळे सरपंच हनुमान तळेकर, कणकवली तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, जिल्हा सरचिटणीस प्रवीण वरूनकर, तालुका सरचिटणीस महेश तेली, ग्रामपंचायत सदस्य सचिन पिसे, ग्रामपंचायत सदस्या समृद्धी कल्याणकर, कमलाकर तांबे, प्रदीपकुमार जाधव, नीलेश मालंडकर, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष अनिकेत दहिबावकर, पंढरीनाथ पांगम, संतोष तेली, व्यापारी संघटना अध्यक्ष स्वप्नील कल्याणकर, योगेश मुद्राळे, सिद्धेश वरूनकर, दाजी कदम, बंड्या ढेकणे, राजेंद्र पिसे, दादा नेवरेकर, अक्षय घाडीगावकर, अहमद बोबडे, भैया खटावकर आदी उपस्थित होते. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष शेख म्हणाले, ‘‘कोणतेही राजकारण न आणता काँग्रेसच्या माध्यमातून विकासकामे करू.’’ अनेक वर्षांची ग्रामस्थांची मागणी पूर्ण केल्यामुळे तरेळे बाजारपेठवासीयांनी प्रवीण वरूनकर यांच्या प्रयत्नांचे कौतुक करून आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com