-देव्हारे आठवडा बाजारात मुंबईकरांची गर्दी

-देव्हारे आठवडा बाजारात मुंबईकरांची गर्दी

४ (टुडे पान ३ साठीमेन)


- rat२३p३.jpg-
२३M०४४३५
देव्हारे : आठवडा बाजारात भरलेला सुकी मासळी बाजार व खरेदी करताना नागरिक.
----------------
देव्हारे आठवडा बाजारात मुंबईकरांची गर्दी

पंचक्रोशीतील गावांना आधार ; सुकी मासळीला मागणी; पायाभूत सुविधा आवश्यक
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २३ ः मे महिन्याच्या सुट्टीसाठी गावी आलेले मुंबईकर देव्हारे आठवडा बाजारात खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. दर मंगळवारी भरणाऱ्या आठवडा बाजारात सुकी मासळी खरेदीसाठी मुंबईकरांनी गर्दी केली. दुपारी बाराच्या नंतर तापमानात प्रचंड वाढ होत असल्याने नागरिकांनी खरेदीसाठी सकाळची वेळ निवडली होती. मात्र आठवडा बाजारातील भौतिक असुविधांमुळे विक्रेत्यांची गैरसोय होत असून छत्रीचा आधार घेवून भर उन्हात बसावे लागते आहे.
देव्हारे परिसरातील धामणी, कळकवणे, गोठे, बोरखत, गोठे बंदरवाडी, कुडुक बुद्रुक, नायणे, मालेगाव, केरील, गोकुळ गाव, गणेशकोंड, उमरोली, कोन्हवली, वडवली, ताम्हाणे, आतले, शेवरे, चिंचघर, भागडेवाडी, वेळास, वेरळ, कबरगाणी, जावळे, आंबवली, पन्हळी बुद्रुक या परिसरातील गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर येतात. तसेच स्थानिकांसह दापोली, पाजपंढरी, हर्णै, मंडणगड येथून सुकी मासळी विक्रेते तसेच सातारा, वाई येथून भाजी विक्रेते येतात. मुंबईकर नागरिक सुकी मासळी खरेदी करून घेवून जातात. सुट्टीत गावी आलेल्या मुंबईकरांनी बाजारात गर्दी केल्याचे चित्र दिसून आली. बांधकाम संबंधित लागणारी सामुग्री, साहित्य बाजारात मिळू लागले असून ऑनलाईन सुविधा केंद्र सुरू झाले आहे. यामुळे देव्हारेला पंचक्रोशीतील मुख्य बाजारपेठेचे स्वरूप प्राप्त झाले होते. सुक्या मासळीबरोबरच पावसाळ्यासाठी कांदा, बटाटा, सुकी मिरची खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
--------

शौचालय, पाण्याअभावी गैरसोय

दरम्यान, बाजारात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असूनही बाजारात शौचालय, विक्रेत्यांना बसण्यासाठी सावली, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अशा सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने नागरिक, व्यापाऱ्यांची गैरसोय झाली. उन्हाच्या कडाक्यापासून रक्षण करण्यासाठी छोट्या छत्र्यांचा आधार घेण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com