-48 तासांत विकास कामांना मंजुरी देतो

-48 तासांत विकास कामांना मंजुरी देतो

६ (टुडे पान १ साठी, सेकंड मेन)

-rat२३p१७.jpg-
२३M०४४६३
गुहागर ः पालकमंत्री उदय सामंत यांचा सत्कार करताना पेवे खरेकोंडचे ग्रामस्थ.
----

विकासकामांना ४८ तासांत मंजुरी देतो

पालकमंत्री सामंत ; पेवे खरेकोंडमधील कार्यक्रमात फटकेबाजी

गुहागर, ता. २३ : वारकरी परंपरेचा वारसा असलेल्या पेवे-खरेकोंड गावाच्या सर्वांगीण विकासासाठी २५ लाख रुपये निधी देतो. नागरिकांनी विकासकामांची यादी तयार करा. ४८ तासात कामांना मंजुरी देतो, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ग्रामस्थांना दिले. ते पेवे खरेकोंड येथील हनुमान मंदिर जीर्णोद्धार सोहळ्यात बोलत होते.
मुंबई महानगरपालिकेतील वरळीचे नगरसेवक व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सहकारी दत्ता नरवणकर यांचे गाव पेवे खरेकोंड. त्यांच्या आग्रहाखातर पालकमंत्री उदय सामंत पेवे-खरेकोंड येथील हनुमान मंदिरात आले होते. ग्रामस्थांतर्फे हनुमान मंदिरात त्यांचा सत्कार करण्यात आला. मंत्री सामंत यांनी राजकीय चिमटे काढत, युतीच्या उमेदवारी विषय भाष्य करत, वेगवान निर्णय गतिमान सरकारची दिशा सांगत चौफेर फटकेबाजी केली.
मंत्री सामंत म्हणाले, राज्यातील युतीचे सरकार देवदेवतांच्या मंदिरासाठी, विकास कामांसाठी मदत करत आहे. राज्यातील ५१ मंदिरासाठी मुख्यमंत्र्यांनी निधी दिला. पेवे-खरेकोंडमध्ये वारकरी मोठ्या प्रमाणात आहेत. सर्वजण पंढरपुरला वारीला जातात. शिंदे फडणवीस सरकारने पंढरपूर तीर्थक्षेत्राचा वाराणसीपेक्षाही सुंदर विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील गावांचा विकासही करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपल्या गावाच्या विकासासाठी २५ लाखांचा निधी देतो. ग्रामस्थांनी संघटीत होवून, मानसिकता बदलून विकासकामांचे प्रस्ताव पाठवावेत. ४८ तासांत मंजुरी देईन. कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे. परंतु महिलांच्या आर्थिक उन्नतीचा जीर्णोद्धार होणे तेवढेच गरजेचे आहे. येथे महिलांसाठी प्रशिक्षण केंद्र हवे असल्यास तेही मी देण्यास तयार आहे.
कार्यक्रमाला माजी आमदार डॉ. विनय नातू, मुंबई वरळी प्रभाग क्र.१९७ चे माजी नगरसेवक दत्ता नरवणकर, पेवे सरपंच भारती सावरटकर, उद्योजक विशाल परब, अॅड. सुरेश सबरद, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रभाकर शिर्के, तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर, तहसीलदार प्रतिभा वराळे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद केळस्कर, उपअभियंता सलोनी निकम आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com