तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र बनवणार वेबसाईट

तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र बनवणार वेबसाईट

rat२३p९.jpg-
०४४४०
रत्नागिरी : तायक्वाँदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रतर्फे येथे आयोजित पंच परीक्षेत सहभागी पंच.
rat२३p१०.jpg
०४४३७
रत्नागिरी : तायक्वाँदो प्रशिक्षक नवीनचंद्र यांचे स्वागत करताना तायक्वाँदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे. सोबत मिलिंद पाठारे व अन्य पदाधिकारी.
--------------
तायक्वाँदो असोसिएशन बनवणार वेबसाईट
डॉ. बारगजे, पाठारे; प्रशिक्षण वर्गांची माहीती मिळणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : तायक्वाँदो संघटनेचे प्रत्येक जिल्ह्यातील अधिकृत पदाधिकारी, प्रशिक्षक यांची माहिती मिळण्यासाठी आता तायक्वाँदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अर्थात ताम स्वतःची वेबसाईट सुरू करणार आहे. या वेबसाईटमुळे सर्वांचाच फायदा होणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे आणि महासचिव मिलिंद पाठारे यांनी दिली.
तायक्वाँदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वाँदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रतर्फे रत्नागिरी मारुती मंदिर इथल्या जिल्हा क्रीडा संकुलात राष्ट्रीय पंच सेमिनार आणि ब्लॅक बेल्ट डॅन परीक्षा आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. इंडियन ऑलिंपिक असोसिएशनची मान्यता असलेली राष्ट्रीय संघटना राज्याच्या ज्या संघटनेला मान्यता देईल, ती संघटना राज्याची अधिकृत संघटना म्हणून घोषित होते. तायक्वाँदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रला आता अधिकृत संघटनेची ओळख मिळाली आहे. सर्व माहिती या वेबसाईटवरून दिली जाईल. आपल्या जिल्ह्यातील तायक्वाँदो खेळाचे अधिकृत प्रशिक्षण वर्ग कोणते हे यावर समजणार आहे, असे डॉ. बारगजे यांनी सांगितले. तायक्वाँदो खेळाडूंनाही शासनाच्या पाच टक्के आरक्षणाचा लाभ घेता येतो. अधिकृत संघटनेच्या प्रशिक्षण वर्गातून या खेळात आपल्या पाल्यांना सहभागी होण्यास जास्तीत जास्त पालकांनी प्रोत्साहित करावे. तायक्वाँदोतील नवीन बदल अंगिकारत खेळ पुढे नेण्यासाठी हे निश्चित फायदेशीर ठरणार आहेत, असे राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष व्यंकटेश कररा, शिवछत्रपती पुरस्कार विजेते मार्गदर्शक प्रवीण बोरसे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com