कांदळवन तोडीच्या तक्रारीची दखल

कांदळवन तोडीच्या तक्रारीची दखल

04582
मालवण ः कांदळवन तोड झाल्याच्या तक्रारीनुसार समितीने घटनास्थळी भेट दिली.

कांदळवन तोडीच्या तक्रारीची दखल

कोळंबमध्ये तालुकास्तरीय समितीकडून पाहणी

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २७ : कोळंब पुलानजीक कांदळवन वृक्षाची तोड झाल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कोकण यांच्या पत्राने तालुकास्तरीय समिती गठीत केली होती. या समितीने परिसराची पाहणी केली; परंतु कांदळवन परिसरात पाणी असल्याने समितीला योग्य पद्धतीने पाहणी करता आली नाही. त्यामुळे या परिसराची पुन्हा पाहणी करण्यात येणार असल्याचे समिती सदस्यांकडून सांगण्यात आले.
कोळंब पुलानजीक उजव्या बाजूला असलेल्या कांदळवन जंगलातील ५ ते ६ कांदळवन वृक्षांची मोठी झाडे तोडल्याची तक्रार मालवण-धुरीवाडा येथील स्वाती पारकर यांनी वनक्षेत्रपाल कुडाळ यांच्याकडे केली होती. विभागीय आयुक्त कोकण विभाग यांच्या कार्यालयाकडील पत्रानुसार यासाठी तालुकास्तरीय समिती गठीत केली होती. याप्रकरणी वस्तुस्थितीची संयुक्त पाहणी करून कांदळवन तोडले आहे अथवा कसे, याबाबत खात्री करून त्याचा अहवाल कार्यालयाकडे देण्याच्या सूचना तहसीलदार श्रीधर पाटील यांनी तालुकास्तरीय समितीला दिल्या होत्या. त्यानुसार वनक्षेत्रपाल कुडाळ, वनक्षेत्रपाल कांदळवन मालवण, उपअधीक्षक भूमिअभिलेख, गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक, मंडळ अधिकाऱ्यांच्या समितीने घटनास्थळाची पाहणी केली; परंतु घटनास्थळी परिसरात पाणी असल्याने योग्य पद्धतीने पाहणी करता आली नाही. त्यामुळे या परिसराची पुन्हा पाहणी करण्यात येणार असल्याचे सदस्यांकडून स्पष्ट करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com