पान एक-मोटार-दुचाकी धडकेत
नानेलीतील तरुण ठार

पान एक-मोटार-दुचाकी धडकेत नानेलीतील तरुण ठार

टीपः swt२३३३.jpg मध्ये फोटो आहे.
०४५९६
रोहित कळसुलकर

टीपः swt२३३५.jpg मध्ये फोटो आहे.
04591
अपघातग्रस्त दुचाकी.

मोटार-दुचाकी धडकेत
नानेलीतील तरुण ठार

कोलगावातील घटना; एक गंभीर जखमी

सावंतवाडी, ता. २३ ः मोटार व दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीच्या मागे बसलेला माणगाव नानेली-घाडीवाडी (ता.कुडाळ) येथील एक युवक जागीच ठार झाला; तर चालक गंभीर जखमी झाला. रोहित रामचंद्र कळसूलकर (वय २१) असे मृताचे, तर उत्तम उदय नेवगी (वय २३) असे जखमीचे नाव आहे. हा अपघात आज (ता. २३) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर कोलगाव ‘आयटीआय’समोर घडला. जखमी तरुणावर येथील उपजिल्हा रुग्णालय उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, रोहित कळसूलकर व उत्तम नेवगी हे दोघे दुचाकीवरून (एमएच ०७, व्ही १११८) सावंतवाडी बाजारपेठेत खरेदीसाठी आले होते. खरेदी झाल्यावर ते सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घरी जाण्यास निघाले. ते जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर कोलगाव ‘आयटीआय’समोर पोहचले असता त्यांच्या गाडीची सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या मोटारीला (एमएच ०७, एबी ७५७५) समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत दुचाकीवर मागे बसलेला रोहित हा रस्त्यावर आदळला. त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. यावेळी आजूबाजूच्या ग्रामस्थांनी तत्काळ रुग्णवाहिकेतून त्याला व गंभीर जखमी उत्तमला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रोहीत याला मृत घोषित केले. जखमी उत्तमवर येथील उपजिल्हा रुग्णालय उपचार सुरू आहेत.
रोहित हा सावंतवाडीत एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. माणगाव येथील एका बॅन्जो पार्टीत वादक म्हणून, तसेच वेल्डिंगचे तो काम करत असे. त्याचे वडील गवंडी काम करतात. त्याला क्रिकेटची आवड होती. त्याच्या पश्चात एक भाऊ, आई, वडील असा परिवार आहे. उत्तम हा मुंबई येथे कामानिमित्त होता. तो काही कामासाठी गावात आला होता. आज सायंकाळी तो मुंबईला जाण्यासाठी निघणार होता. मात्र, त्याला सुदैवाने मोठी दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळतात माणगाव, नानेली, आकेरी येथील ग्रामस्थ, मित्रपरिवाराने येथील उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. येथील पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे, पोलिस उपनिरीक्षक आनंद यशवंते, पी. जी. नाईक, संतोष गलोले आदींनी घटनास्थळी भेट दिली. याबाबतचा अधिक तपास श्री. गलोले करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com