पान एक-सिंधुदुर्गातील सुपुत्र
युपीएससीत चमकले

पान एक-सिंधुदुर्गातील सुपुत्र युपीएससीत चमकले

टीपः swt2331.jpg मध्ये फोटो आहे.
04599
वसंत दाभोलकर

टीपः swt2317.jpg मध्ये फोटो आहे.
04570
तुषार पवार

सिंधुदुर्गातील दोघे
युपीएससीत चमकले

एक वेंगुर्लेतील, तर दुसरा मालवणातील

वेंगुर्ले/मालवण ता. २३ ः सिंधुदुर्गातील वेंगुर्ले व मालवण तालुक्यातील दोघा सुपुत्रांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेत घवघवीत यश संपादन करून सिंधुदुर्गाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. दाभोली (ता. वेंगुर्ले) गावचा सुपुत्र वसंत प्रसाद दाभोलकर यांनी संपूर्ण भारतातून या परीक्षेत ७६ वा रँक मिळवला, तर नांदोस-चव्हाणवाडी (ता. मालवण) येथील तुषार पवार यांनी ८६१ वा रँक प्राप्त केला. सरकारी शाळांमध्ये माध्यमिक शिक्षण घेऊन या दोघांनीही मिळविलेले हे यश जिल्ह्यासाठी गौरवशाली ठरले आहे.
दाभोलकर कुटुंब दाभोली येथे स्थायिक असून, वसंत यांच्या वडिलांची बागबागायती आहे. वसंत हे मुळातच हुशार विद्यार्थी होते.
दाभोली येथील जिल्हा परिषद शाळेत त्यांचे प्राथमिक, तर वेंगुर्ले हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण झाले. बारावीनंतर त्यांनी रत्नागिरीच्या फिनोलेक्स कॉलेजमधून इंजिनिअरिंगची पदवी घेतली. यानंतर राष्ट्रीयस्तरावरील सर्वात कठीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. २०२२ ला झालेल्या परीक्षेचा निकाल नुकताच झाला. यात त्यांनी राष्ट्रीयस्तरावर ७६ वा रँक मिळवला. त्यांना आयएएस रँक मिळण्याची शक्यता आहे. तुषार हेही सामान्य कुटुंबातून शिक्षण घेत या यशापर्यंत पोचले आहेत. त्यांचे वडील दीपक पवार हे कणकवली येथील खरेदी-विक्री संघात काम करतात, तर आई घरी शिवणकाम करते. या दोघांच्या या यशाबद्दल जिल्ह्यातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com