स्टंटबाजीपेक्षा महसूलची रिक्‍तपदे भरा

स्टंटबाजीपेक्षा महसूलची रिक्‍तपदे भरा

04701
सुशांत नाईक

स्टंटबाजीपेक्षा महसूलची रिक्‍तपदे भरा

सुशांत नाईक; अमावस्या, पौर्णिमेला आमदार राणेंचे अवतरण

कणकवली, ता.२४ : अमावस्या पौर्णिमेला कणकवली मतदारसंघात अवतरणाऱ्या आमदार नीतेश राणे यांनी नुकतीच महसूल विभागाला भेट दिली. यावेळी त्‍यांनी तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांना झापण्याची स्टंटबाजी केली; पण मुळात महसूलमध्ये रिक्‍तपदांची संख्या मोठी आहे. एका तलाठ्याकडे दोन ते तीन गावांचा भार दिला आहे. त्‍यामुळे आधी महसूलमधील रिक्‍तपदे भरण्यासाठी प्रयत्‍न करा, अशी टीका युवासेना जिल्‍हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आज केली.
श्री.नाईक म्‍हणाले, सोमवारी २२ रोजी कणकवलीत आलेल्‍या आमदार राणे यांनी तहसील कार्यालयात जाऊन तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेण्याची स्टंटबाजी केली आणि तेथून निघून गेले; पण या स्टंटबाजीतून जनतेला काहीच फायदा झाला नाही. राणे प्रतिनिधित्व करत असलेल्‍या कणकवली तालुक्‍यात तलाठ्याची तब्‍बल २० पदे रिक्‍त आहेत. खुद्द कणकवली शहराला तलाठी नाही. एका तलाठ्याकडे दोन पेक्षा अधिक गावांचा चार्ज दिला आहे. त्‍यामुळे जनतेच्या कामांचा खोळंबा होत आहे. अशीच परिस्थिती भूमी अभिलेख आणि महसूलच्या इतर विभागांमध्ये आहे. त्‍यामुळे शो शायनिंग आणि स्टंटबाजी करण्यापेक्षा आमदार नीतेश राणे यांनी महसूलमधील रिक्‍तपदे भरण्यासाठी प्रयत्‍न करावेत. तरच जनतेची कामे वेगाने होणार आहेत.
नाईक म्‍हणाले, ‘‘कुडाळ मालवणच्या जनतेला तेथील आमदार कधीही उपलब्‍ध होतात; पण कणकवली मतदारसंघातील आमदाराला भेटण्यासाठी जनतेला महिने घालवावे लागतात हे दुर्दैव आहे. त्यामुळे जनतेनेही आता माजी खासदार नीलेश राणेंप्रमाणेच, कणकवलीचा आमदार बदलून नीतेश राणेंना कायम स्वरूपी मुंबईत पाठविण्याची वेळ आली आहे. नीतेश राणे राष्ट्रीय राजकारणात व्यस्त आहेत. मोठं मोठ्या नेत्यांवर एकेरी भाषेत टीका करून कणकवली मतदारसंघ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची बदनामी ते करत आहेत. मतदार संघातील प्रश्नांबाबत त्यांना कोणतेही सोयरसुतक नाही. मुळात प्रश्न सोडवायला त्यांच्याजवळ वेळही नाही. त्यामुळे कणकवली मतदारसंघात समस्या जैसे थे आहेत.’’
----
जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवा
‘‘नीतेश राणे यांना प्रशासकीय ज्ञान नसल्याने शासनाच्या विविध योजनांचा लाभ मतदारसंघाला मिळवून देता येत नाही. कणकवली मतदारसंघात गावागावातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. आता पावसाळा सुरू होणार असल्याने खड्डेमय रस्त्यातून नागरिकांना प्रवास करावा लागणार आहे. आमदार शिफारशींचे दाखलेही जनतेला दिले जात नाहीत. त्यामुळे नीतेश राणे यांनी जनतेचे मुलभूत प्रश्न सोडवावे, लोकांच्या छोट्या गरजा पूर्ण कराव्यात. नंतर स्टंटबाजी करावी,’’ अशी टीका नाईक यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com