-सर्व विभागातील कर्मचार्‍यांसाठी पुरस्कार द्या

-सर्व विभागातील कर्मचार्‍यांसाठी पुरस्कार द्या

२६ (पान २ साठी)


- rat२४p१४.jpg-
२३M०४७०७
रत्नागिरी ः पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी.
----
सर्व विभागातील कर्मचाऱ्यांसाठी पुरस्कार द्या

पालकमंत्री उदय सामंत ; कायाकल्प पुरस्कार प्रदान

रत्नागिरी, ता. २४ ः जिल्हापरिषदेतील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांसाठी पुरस्कार देण्याबाबत विचार करावा, जेणेकरून काम करण्यास प्रोत्साहन मिळेल असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
कायाकल्प योजनेंतर्गत जिल्हास्तरावरील उत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्यवर्धिनी उपकेंद्रासह जिल्हयातील उत्कृष्ट काम केलेल्या ६ आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यिका यांना फलोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार, कायाकल्पतील ११ उपकेंद्र व १३ प्राथमिक आरोग्य केंद्र, सर्वोकृष्ट काम केलेल्या ९१ आशा स्वयंसेविका या सर्वांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. फुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमावेळी आरोग्य संजीवनी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच प्रथम पुरुस्कार प्राप्त रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्र व आंबडवे येथील आरोग्यवर्धिनी उपकेंद्र यांना पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार म्हणाले, अंगणवाडीसेविका, आशा या तळागाळात जे चांगले काम करत आहेत, त्यांच्यावरच जिल्हा परिषदेचा डोलारा उभारलेला आहे. त्यांचा सन्मान या पुरस्कारातून करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com