-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

२४ (टुडे पान १ साठी, संक्षिप्त)

१ जूनपासून मासेमारी बंदी

पावस ः राज्याच्या सागरी क्षेत्रामध्ये १ जून ते ३१ जुलै या कालावधीमध्ये मासेमारी करण्यास बंदी लागू करण्यात आल्याचे आदेश मत्स्य व्यवसाय विभागाने दिले आहेत. मासळीच्या साठ्याचे जतन तसेच मच्छीमारांची जीवित व त्यांचे रक्षण करण्याच्या हेतूने महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ च्या कलम ४ च्या पोटकलम १ द्वारे प्राप्त अधिकारांचा वापर करून १ जून ते ३१ जुलै (दोन्ही दिवस धरून) राज्याच्या जलधी क्षेत्रात मासेमारी नौकांस पावसाळी मासेमारी बंदी घालण्यात आलेली आहे. ही पावसाळी मासेमारी बंदी यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी लागू राहील. पावसाळी मासेमारी बंदी पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यंत्रचलीत नौकाना लागू राहणार नाही.
--

पेठमापला २९ मे रोजी रक्तदान शिबिर

चिपळूण ः रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान या ध्येयाने प्रेरित होऊन येथील ब्लडलाईन ग्रुप आणि पेठमाप एकता विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने २९ मे रोजी जिल्हा परिषद पेठमाप प्राथमिक शाळा येथे सकाळी १० ते २ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. ब्लडलाईन ग्रुपच्या माध्यमातून सातत्याने गरजू रुग्णांना तातडीने रक्तपुरवठा करण्यासाठी योगदान दिले जाते. जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा भासत असल्याने या रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. यामध्ये पेठमाप विभागासह चिपळूण मधील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तीही रक्तदान करणार आहेत. शिबिरात सहभागी होण्यासाठी अमजद मुकादम, एजाज मुकादम, शशिकांत पवार, योगेश कोलगे, संदीप आग्रे, विकी लवेकर, शहानवाज पोटे, रईस आरकाटे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ब्लडलाईनचे प्रमुख अमोल टाकळे यांनी केले आहे.

--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com