गौतमीतील गाळ उपशाचा पहिला टप्पा पूर्ण

गौतमीतील गाळ उपशाचा पहिला टप्पा पूर्ण

१६ (पान २ साठी)


-rat२६p१९.jpg,
२३M०५१५६
पावस ः येथील गणपती मंदिराजवळ नदीपात्रात पूर्वी असलेला गाळ आणि
rat२६p२०.jpg ः
२३M०५१५७
दुसऱ्या छायाचित्रात आता नव्याने गाळ काढल्यानंतर नदीचे विस्तारित पात्र.
----

गौतमीतील गाळ उपशाचा पहिला टप्पा पूर्ण

पावस, ता. २६ ः राज्य शासन, नाम फाउंडेशन आणि पावस ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने पावसमधील गौतमी नदीच्या गाळ उपसाच्या कामाला सुरवात करण्यात आली असून त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. नदीपात्रातील पाण्याचा स्रोताला चांगली गती प्राप्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गौतमी नदीतील पावस ग्रामपंचायत ते गणपती मंदिर या पहिल्या टप्प्यातील गाळ उपसण्यात आला. याकरिता जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ७ लाख रुपये निधी दिला. त्याचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले. त्यामुळे त्या मे अखेरसुद्धा पाण्याची स्थिती चांगल्या स्थितीत आहे. पाच ते सहा फूट पात्र खोदण्यात आले. अशा तऱ्हेने या नदीतील गाळ नदीपात्राजवळ न टाकता अन्य ठिकाणी व परिसरामध्ये टाकण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यातील गाळ उपसण्याचे काम सुरू झाले असून, आणखी निधी पालकमंत्री उपलब्ध करणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत गाळ उपसण्याचे काम सुरू राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com