खेडमधील 22 शाळांचा निकाल 100 टक्के

खेडमधील 22 शाळांचा निकाल 100 टक्के

३५ (पान २ साठी)

खेडमधील २२ शाळांचा निकाल १०० टक्के

खेड, ता. २६ ः बारावीच्या निकालामध्ये खेड तालुक्याने यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. २६पैकी २२ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला असून, तालुक्यातून ज्ञानदीपचा अद्वैत प्रशांत कुबडे ९५.१७ टक्के गुण मिळवून वाणिज्य शाखेतून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे तर वैष्णवी दीपक शिंदे हिने ९४.३३ टक्के गुण मिळवून दुसरा तर तिसरा क्रमांक आर्या अनिल पडवेकर हिने ९४ टक्के गुण मिळवून प्राप्त केला आहे.
महाविद्यालयीन निकालांतर्गत एस. आय. सेकंडरी फुरूस सायन्स शाखेचा ९७.६४ टक्के निकाल लागला आहे. एल. पी. इंग्लिश स्कूल ज्युनि. कॉलेजची कला शाखा (८४.२१), वाणिज्य (८५). श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कूल व ज्युनि. कॉलेजच्या सायन्स (९८.७४), कला शाखा (९४.५९) तर वाणिज्य (९९.०९) इतका लागला आहे. न्यू इंग्लिश व ज्युनि. कॉलेजचा सायन्स (१०० टक्के), कला (१०० टक्के) तर वाणिज्य (५७.२९) टक्के लागला आहे. नवभारत हायस्कूल ज्युनि. कॉलेज भरणेच्या सायन्स (१०० टक्के), कला (९९.३२), वाणिज्य (१०० टक्के) लागला आहे. हाजी एस. एम. मुकादम महाविद्यालयाचा कलाचा ८७.५० टक्के तर वाणिज्यचा निकाल १०० टक्के लागला आहे. विश्वनाथ विद्यालय महाविद्यालयाचा निकाल सायन्स ९७.९० टक्के, कला ८६.०५ टक्के तर वाणिज्यचा ९२.३० टक्के इतका लागला आहे. आदर्श हायस्कूल महाविद्यालय कर्जीचा वाणिज्यचा १०० टक्के निकाल लागला आहे.
यशवंत विद्यालय धामणंदच्या कला शाखेचा निकाल १०० टक्के, वाणिज्य ९४.४४ टक्के, ज्ञानदीप भडगावचा सायन्स व वाणिज्यचा निकाल १०० टक्के, कर्मयोगी रेवाळे हायस्कूल मुरडेच्या वाणिज्य (१०० टक्के), एलटीटी सायन्स व वाणिज्य (१०० टक्के), छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूल जामगे सायन्स (१०० टक्के), न्यू इंग्लिश स्कूल व खवटीचा कला व वाणिज्य (१०० टक्के), न्यू इंग्लिश स्कूल आंबवलीच्या कला व वाणिज्य (१०० टक्के), कनिष्ठ कला-वाणिज्य महाविद्यालय तळेचा कला शाखा (१०० टक्के) तर वाणिज्य (७८.५७ टक्के), संत तुकाराम हायस्कूल अनसपुरेची कला शाखा (११०), वाणिज्य (९३.३३), एमवाय हजवानी ज्युनि. कॉलेजच्या कला व वाणिज्य (१०० टक्के), ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल मोरवंडेचा सायन्स (९९.१७) व वाणिज्य (१०० टक्के), एमआयबी गर्ल्स हायस्कूलच्या सायन्स व वाणिज्य (१०० टक्के), नारायणराव कदम महाविद्यालय चिंचघरचा वाणिज्य (१०० टक्के), छत्रपती शिवाजी हायस्कूल व महाविद्यालयच्या वाणिज्य (१०० टक्के), श्री समर्थ कृपा इंग्लिश स्कूल व महाविद्यालय वेरळच्या वाणिज्य (१०० टक्के), एस. एम. ज्युनिअर कॉलेजच्या सायन्स व वाणिज्य (१०० टक्के), गव्हर्नमेंट आयटीआय खेडच्या टेक. सायन्सचा निकाल १०० टक्के लागला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com