क्राईम पट्टा

क्राईम पट्टा

पान 3 साठी

मारहाणप्रकरणी सहा जणांवर गुन्हा
रत्नागिरी ः मच्छीच्या जाळीच्या रिंगा चोरल्याच्या गैरसमजातून सहा जणांनी लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी सहा संशयितांविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा केला आहे. हुजैफ साखरकर, नईम वस्ता, निहाल वस्ता, इम्रान सोलकर, कैफ मुकादम, यासीन मस्तान अशी त्या संशयितांची नावे आहेत. ही घटना गुरुवारी (ता. २५) सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास मिरकरवाडा येथील पोलिस चौकीच्या मागील बाजूस घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदारांनी मच्छीची जाळी चोरल्याचा संशयित हुजैफ साखरकर यांनी गैरसमज केला. या रागातून सहा संशयितांनी फिर्यादीला लोखडी रॉड, फायबर रॉड, लाकडी दांडा व हाताने मारहाण केली. या प्रकरणी फिर्यादी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी सहा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमलदार करत आहेत.

अमली पदार्थ बाळगणाऱ्याला अटक
रत्नागिरी ः शहरातील क्रांतीनगर येथील मुख्य रस्त्यावर ब्राऊन शुगर, हेरॉईन व चरस बाळगणाऱ्या संशयिताच्या शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. शहर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध एमडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. जुबेर अहमद अमिरूद्दिन खान (वय ४५, रा. चर्चरोड, बाजारपेठ रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २४) रात्री साडेआठच्या सुमारास क्रांतीनगर मुख्य रस्त्यावर निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयित ब्राऊन शुगर, हेरॉईन व चरस बाळगलेल्या स्थितीत सापडला. या प्रकरणी पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमलदार करत आहेत.

रेल्वेत चढताना पडून वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी ः रेल्वेतून पडून जखमी झालेल्या वृद्धाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लक्ष्मण दर्शन वालावलकर (वय ६०, रा. रानबांबोळी, कावळेवाडी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २५) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वृद्ध वालावलकर ओरस सिंधुदुर्ग येथून दिवा पॅसेंजरने रत्नागिरीत आले होते. रत्नागिरी रेल्वेस्टेशनला एर्नाकुलम निजामुद्दीन रेल्वेत चढत असताना ते पडले. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

तणनाशक प्यायल्याने वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी ः तालुक्यातील हरचिरी येथील वृद्धाने आजाराला कंटाळून तणनाशकाचे प्राशन केले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गजानन अर्जून रोकडे (वय ६०, रा. हरचिरी, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २५) सकाळी ८ वाजता जिल्हा रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गजानन रोकडे यांनी आजाराला कंटाळून गवत मारण्याचे औषध प्राशन केले होते. उपचारासाठी त्यांना प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र चांदेराई येथे दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गावखडीत हातभट्टी दारूविक्रीवर कारवाई
पावस ः तालुक्यातील गावखडी-भंडारवाडी येथील विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्याविरुद्ध पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुहास महादेव पाटील असे संशयितांचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २५) सायंकाळी पावणेआठच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित हे विनापरवाना हातभट्टीची दारू विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयित दारू विक्री करताना सापडला. या प्रकरणी पोलिसांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्ररीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


५२०८

सुकीवलीनजीक अपघातात दोघे जखमी
खेड ः आंबवली मार्गावरील सुकीवलीनजीक कार झाडाला ठोकरून झालेल्या अपघातात दोघेजण किरकोळ जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी (ता. २६) दुपारी बाराच्या सुमारास घडला. सुकीवलीनजीक कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट झाडावर आदळून अपघात झाला. यामध्ये चालकासह अन्य एकजण जखमी झाला. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थानी त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केल्याने त्यांची नावे मात्र उपलब्ध होऊ शकली नाहीत. या अपघातात कारचे दर्शनी भागाचे नुकसान झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com