केंद्रे पुनर्वसन गावातील
पूरग्रस्तांना घरकुले द्या

केंद्रे पुनर्वसन गावातील पूरग्रस्तांना घरकुले द्या

05232
दोडामार्ग ः येथे पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडे निवेदन देताना उदय जाधव, सोबत प्रदीप गावडे व अन्य. (छायाचित्र - संदेश गवस)

केंद्रे पुनर्वसन गावातील
पूरग्रस्तांना घरकुले द्या
उदय जाधव ः उपोषणाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २६ ः केंद्रे पुनर्वसन गावातील पूरग्रस्त लोकांना घरकुलाचा लाभ द्यावा; अन्यथा जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे कार्यालयाच्या ठिकाणी उपोषणास बसू, असा इशारा येथील उदय जाधव यांनी दिला आहे. तसे निवेदनही जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत आयनोडे-हेवाळेमधील केंद्रे पुनर्वसन गावात आलेल्या पुरामुळे घरात पाणी शिरले व लोकांच्या भिंती पडुन नुकसान झाले होते. या नुकसानीची मंत्र्यांनी तसेच जिल्हा परिषद विभागातील संबधित अधिकारी, तलाठी यांनी पाहणी करून पंचनामा केला होता. पंचयादी करून पूरग्रस्तांना तात्काळ घरकुलाचा लाभ मिळावा, असे मंत्र्यांनी ग्रामपंचायत तसेच प्रशासनाला सांगितले होते. त्यानुसार यादी तयार करून ग्रामपंचायतला दिली होती. असे असुन देखील गेली तीन ते चार वर्षे होऊनही यावर प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही. बऱ्याच वेळा ग्रामपंचायतमध्ये जावून देखील आज-उद्या असे सांगुन अद्यापपर्यंत पूरग्रस्तांना घरकुल अनुदानाच्या लाभापासून वंचित ठेवलेले आहे. त्यामुळे प्रशासकिय पातळीवर याबाबत योग्य ती चौकशी व विचार विनिमय करून आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सबंधित कार्यालयामार्फत माहिती मागवून घेवून तात्काळ १२ जूनपर्यंत घरकुल अनुदान लाभ मिळावा. अन्यथा केंद्रे पूरग्रस्त ग्रामस्थांसहीत १३ जूनपासून जिल्हा परिषद सिंधुदुर्ग याठिकाणी उपोषणास बसण्याचा इशारा उदय जाधव यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी पुरग्रस्त ग्रामस्थ प्रदिप गावडे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com