राऊतांचा पराभव करून दाखवाच

राऊतांचा पराभव करून दाखवाच

05277
कुडाळ ः येथे पत्रकार परिषदेत बोलताना संजय पडते. बाजूला मंदार शिरसाट, उदय मांजरेकर, अनुप नाईक, संदीप म्हाडेश्वर.

राऊतांचा पराभव करून दाखवाच

संजय पडतेंचे केसरकरांना आव्हान; निवडणूक आली की केवळ आश्वासने

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २६ ः सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासंदर्भात पक्षाने जबाबदारी दिल्यास मी ती निश्चितपणे घेईन आणि विद्यमान खासदार विनायक विनायक राऊत यांना पराभूत करेन, असे वक्तव्य शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले होते. याला प्रत्युत्तर म्हणून आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी मंत्री दीपक केसरकर यांना ‘‘केसरकर यांनी खासदार राऊत यांचा पराभव करून दाखवावाच’’, असे खुले आव्हान दिले आहे. ते आज कुडाळ येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
श्री. पडते म्हणाले, ‘‘सावंतवाडी मतदारसंघात जनता केसरकर यांची वाट पाहत आहे. कारण सहा-सहा महिने केसरकर कुठल्याही गावात भेट देत नाहीत. केवळ निवडणूक आली की आश्वासने द्यायची, खोटे बोलायचे. पण, रेटून बोलायचे की केसरकर यांची कामे आहेत. चष्म्याचा कारखाना, सेट टॉप निर्मिती ही आश्वासनेच केसरकर यांनी दिलीत. खासदार राऊत हे अगदी दोडामार्ग ते चिपळूणपर्यंत सर्वसामान्य नागरिकांशी भेटी घेत आहेत. सिंधुदुर्गात मेडिकल कॉलेजसाठी राऊत यांनीच प्रयत्न केले. दुसरीकडे केसरकर यांनी स्वतःच्या मतदारसंघात काय केले? याचे आत्मचिंतन करावे. स्वतःच्या स्वार्थासाठी आपण किती पक्ष बदलले? तुम्हाला विकासाचे काहीही पडलेले नाही. त्यामुळे येथील लोक तुमची आता वाट पाहत आहेत की, कधी केसरकर येतात. त्यामुळे तुमच्या मतदारसंघातील नागरिक लवकरच तुमचे पार्सल तुमच्या घरी पाठवणार आहेत.’’
----------
चौकट
शिक्षकांना नोकरी देण्याचे काम करा
जिल्ह्यात डीएड बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून शिक्षक भरती झालेली नाही. त्यामुळे राज्याचे शिक्षण मंत्री असलेल्या केसरकर यांनी आधी शिक्षकांना नोकरी देण्याचे प्रयत्न करावेत. दोडामार्गमध्ये हत्तींचे थैमान असून याबाबत केसरकर मात्र काहीच करत नाहीत, अशी टीका त्यांनी केली. सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ले तालुक्यामध्ये जी भूमिपूजन झाली, त्याला नागरिकांनी पाठ फिरवली. ही सर्व विकासकामे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना मंजूर करण्यात आली असल्याचेही माहिती पडते यांनी दिली. त्यामुळे दीपक केसरकर यांनी या विकासकामांचे श्रेय घेऊ नये, असाही टोला पडते यांनी लगावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com